Thursday, April 27, 2017

देवा रे देवा...एअरलिंगळी चावली....Scorpion On Board and In Heart

(टीप : एअरलाईन मधील इंगळी = एअरलिंगळी)

सध्या विमान प्रवास खूप चर्चेत आहेत. 

एका प्रवासाआधी प्रवाशाने एअरलाईन स्टाफला बेदम मारले, दुसऱ्या प्रवासाआधी एअरलाईन स्टाफने प्रवाशाला. 

"a passenger was viciously dragged off of a flight, suffering a concussion, broken bones and lost teeth"
 
ज्यावेळी 'United Airlines Passenger Stung by a Scorpion' अशी बातमी वाचली त्यावेळी आठवले संत एकनाथ आणि त्यांची रचना:

"...अग, .. विंचू चावला
देवा रे देवा.. विंचू चावला
आता काय मी करू.. विंचू चावला


काय मी करू विंचु चावला..."


एकनाथांच्या उरलेल्या ओळीतून सगळ्यांना बरच काही शिकण्यासारखे आहे.

"...या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा

तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
सत्त्वगुण लावा अंगारा, अन्विंचू इंगळी उतरे झरझरा...."

 

Artist: Patrick Chappatte (1967-), The New York Times

Sunday, April 23, 2017

मी बिस्वम्भर रॉय नाही पण... Satyajit Ray Died 25 Years Ago Today

आज एप्रिल २३ २०१७, सत्यजित रे यांचा २५वा स्मृतिदिन


Philip French:
"...Beside my working desk as I write is an autographed photograph of Ray and his friend Akira Kurosawa walking a couple of feet apart and deep in thought in front of the Taj Mahal. It was taken in the mid-70s during a trip to Agra from a film festival in New Delhi, on which I had the privilege to accompany them. It is a constant reminder to me of the heights to which cinema, the great new art of the 20th century, can aspire, and why writing serious criticism can be an honourable undertaking."

एप्रिल १९९२च्या शेवटी, रोजच किमान १२ तास लोड शेडींग असलेल (लोकांच्या घरी इनव्हर्टरच्या बरोबरीने छोटे डिझेल जनरेटर असत!),  कलकत्ता आम्ही सोडल. रे वारल्यानंतर मी अंजुला म्हणालो आता कलकत्ता सोडायच दुःख कमी होईल कारण इथ आता  रे नाहीत. त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी 'नंदन' मध्ये ठेवल होत. मी तेथुन दोन-तीन वेळा तरी चालत गेलो पण आत काही गेलो नाही.

त्यांच घर माझ्या ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर होत. बऱ्याचवेळा मी त्यांच्या घरावरून (बिशप लेफ्रॉय रोड , जे आता पर्यटक आकर्षण झालय म्हणे) चालत गेलो आहे,  विचार करत की अत्ता रे आत असतील का, काय करत असतील!

ते गेल्यावरच्या आठवड्यात अंजु न आणि मी त्यांचे जवळ जवळ सगळे सिनेमा दूरदर्शन वर पहिल्यांदा पहिले. त्यांच्या एवढ्या मोठया कलाकाराच जाण अपेक्षेप्रमाणे कडू-गोड ठरल ...सत्यजित रे कसले गेले? सिनेमा दाखवत बसले...

रें चे कितीतरी उल्लेख ह्या ब्लॉग वर आले आहेत. उदा इथे: "Is She J E Millais's "Mariana" or Ray's "Charulata"?"

 मला सगळ्यात जास्त आवडलेला रें चा सिनेमा, 'चारुलता'हून सुद्धा काकणभर जास्त: जलसाघर, १९५८ (Jalsaghar).

जशी मराठी मध्यमवर्गाला साधारण सन २०००  नंतर आर्थिक सूज येत गेली (प्रामुख्याने मोठ्या शहरातील एक्सपोनेनशियली वाढत गेलेल्या घराच्या किमती, आय.टी., ग्लोबलायझेशनचा चढता आलेख, तगडा डॉलर मुळे) तसा हा सिनेमा मला जास्त आवडत आलाय.

एखाद्या विषयाचा खोल अभ्यास/ वाचन  नसताना त्याबाबत हिरीरीने व्यक्त  होणारे, कुठल्याही गोष्टीकडे जरासुद्धा दीर्घ/ऐतिहासिक दृष्टिकोनातून  न पाहणारे, एकाच नजरेतून जगातील प्रत्येक गोष्ट घटना पाहणारे, ज्याअर्थी आपण (किंवा आपली मुले) आर्थिक किंवा इतर बाबतीत इतके यशस्वी आहोत म्हणजे आपल्याला वाटते ते वैश्विक सत्यच असणार असे समजणारे, बोलण्याचे विषय पैसा-दिसणे-जीम-फिटनेस- वार्षिकव्हेकेशन  इतकेच असलेले नवश्रीमंत माहीम गांगुली सर्व क्षेत्रात  वाढत गेले, आणि त्यातील  काही कधीकधी जवळचे नातेवाईक सुद्धा निघाले!

मी बिस्वम्भर रॉय नाही पण मला त्यांची वेदना समजते- त्यांच्या पत्नी आणि पुत्र शोकाइतकीच ती क्लेशकारक आहे, त्यांचे 'तुफानी' नाहीसे होणे समजते....

 बिस्वम्भर रॉय आणि तूफान : आनंदी दिवसां मध्ये  

पण मला रे सर्वात जास्त आवडतात त्यांच्या लिखाणातील अशा सचोटी मुळे : 
 "… The one thing I am very much interested in is a loner – one person. Quite often in my stories you will see just one person ; he hasn't married, he doesn't have any children, he lives with his own preoccupations … I have personally realised what loneliness is during most of my life. … And often I feel, if I were asked ‘Who is your friend?' I would not be able to name anyone … I am quite alone. Quite alone and I have become used to it. At no time have I regretted the fact that I am alone, or that I lack friends.…”

“The fact that the man doesn’t know what is happening really, doesn’t know the process of history, makes him a figure of pathos. He’s pathetic, like a dinosaur that doesn’t realise why it’s being wiped out.”


 स्वतः रेंनी डिसाईन केलेले जलसाघरचे पोस्टर ... इतके देखणे (उदा: फॉन्ट) आणि बोलके (उदा: दुभंग) पोस्टर मी पहिले नसेन

Tuesday, April 18, 2017

'ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत'...बेपर्वा शेरेबाजी?...Vilas Sarang

एप्रिल १४, २०१७ ला  विलास सारंगांचा दुसरा स्मृतिदिन होता

विलास सारंग, 'लिहित्या लेखकाचं वाचन', २०११:

"...(अशोक) शहाणेंच्या 'क्ष- किरण' लेखाने बेपर्वा शेरेबाजी करण्याची पद्धत रूढ केली. ती इतरांबरोबरच (भालचंद्र) नेमाडेंनी आपलीशी केली..." (* तळटीप पहा)

"...सौन्दर्य शास्त्र  हे एक मायाजाल आहे व त्यापाठी लागून कितीकांनी  आपले शब्द वाया घालवले. मराठीला जरूर होती  संहितांचं  सूक्ष्म , कठोर परीक्षण करण्याची ..." 

मराठीतील द ग गोडसे, म वा धोंड,  विलास सारंग, वसंत सरवटे, दुर्गा भागवत आणि माझे वडील या लोकांमुळे समीक्षा हा प्रकार मला आवडायला लागला. सारंगांच्या सूचनेप्रमाणे मी फक्त जमेल तसे संहितेचे सूक्ष्म परीक्षण करतो.  सौन्दर्य शास्त्र म्हणजे काय हे मला माहिती सुद्धा नाही. मराठीतील आघाडीचे समीक्षक कित्येकदा काय म्हणत असतात हे मला जरा सुद्धा समजत नाही. मला माहित-आठवत  असलेल्या सगळ्या गोष्टींची- गद्य, पद्य, चित्र, शिल्प वगैरे - सांगड घालायचा प्रयत्न करतो. माहित नसलेले होईल तेव्हढे- online, offline- वाचतो. इंग्लिश जास्त वाचतो.

सारंगांची समीक्षेची पुस्तके म्हणजे अलिबाबाची गुहाच...प्रत्येक लेख खचाखच माहिती आणि निरीक्षणांनी भरलेला...त्यातून दिसणारी त्यांची बुद्धिमत्ता, विनोद बुद्द्धी, विद्वत्ता, इंग्लिश-मराठी भाषा प्रभुत्व....आपल्या आजाराबद्दल बोलताना कायम एक मिश्कील आवाज, जो कधीही सेंटीमेंटल होत नाही (स्वतःच्या कुटंबाबद्दल मात्र जवळ जवळ शांतताच पाळतात)....कुठलेही पुस्तक उघडून कुठेही वाचायला सुरु करा...एखाद मधुर गाण कुठूनही ऐकता येत तस...

'गुहे'त एक दोन दालनांचा अभाव मात्र प्रकर्षाने जाणवतो...सायन्स फिक्शन आणि ग्राफिक नॉवेल या प्रकारात जन्माला आलेल्या जगातील महान कलाकृतींबद्दल सारंग काहीच बोलत नाहीत...फिलिप के डिक (Philip K. Dick), जे जी बॅलार्ड (J G Ballard), अॅलन मूर (Alan Moore), आर्ट स्पीगलमन (Art Spiegelman)- मधले दोघ ब्रिटिश- कसे सुटले त्यांच्या नजरेतून?

दृश्य कलांबद्दल पण सारंग  क्वचितच लिहताना आढळतात... ठणठणपाळाबद्दल - कौतुकाने आणि थोड शिष्टपणे - लिहतात पण वसंत सरवटेंचा उल्लेख न करता:  'क्लोज रिडींग' मध्ये 'क्लोज वॉचिंग' येत नसाव!

... आणि त्यांची सगळीच मते पटतात असेही नाही...एक उदाहरण:

"...ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत. त्यांना 'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही..." असं ज्यावेळी सारंग लिहतात (पृष्ठ ४५, Ibid), त्यावेळी त्यांनी जोसेफ कॉनरॅड वाचला- क्लोज रिडींग  तर सोडाच- तरी आहे का याची शंका वाटते (अर्थात कॉनरॅडना ते पोलिश म्हणू शकतात!) कारण 'आतंकवादाच्या जमान्यात'  या लेखात त्यांचा उल्लेखही नाही. गेल्या दीड-दोनशे वर्षातील जगातील सगळ्यात मोठा द्रष्टा कादंबरी- कथा-लेखक म्हणून आज कॉनरॅड यांच नाव घेतल जात.

कॉनरॅड व्यतिरिक्त- फक्त विसाव्या शतकातील कथा, कादंबरीकार बोलायच तर- जॉर्ज ऑरवेल, ऑल्डस हक्सली, एवलिन वॉ, ग्रॅहम ग्रीन (आणि वर आलेले जे जी बॅलार्ड, अॅलन मूर)  : सगळे बिनडोक? कोणालाच  'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही?

ज्या रशियन क्रांतीला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या क्रांतीचा मुडदा कसा पडला हे पहिल्यांदा ऑरवेलनी सर्वात प्रभावीपणे जगासमोर आणल, आणि ते सुद्धा एक पॅराबलच्या माध्यमातून.  १९४५ पासून त्या पुस्तकाची आजपर्यंत जगभरात अभूतपूर्व विक्री झाली आहे. ऑरवेलांचे 'Nineteen Eighty-Four', १९४९ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक पुन्हा एकदा या वर्षी, २०१६-२०१७, जगात बेस्टसेलर झाल आहे...

आता प्रश्न असा येतो: "...ब्रिटिश लेखक बिनडोक आहेत. त्यांना 'थीम' वगैरेची गंधवार्ता नाही..." याला 'बेपर्वा शेरेबाजी' म्हणत दुर्लक्ष करायच का आम्ही?

आणखी एक-दोन  निरीक्षण.

सारंग त्यांच्या 'अक्षरांचा श्रम केला', २००० मध्ये दुर्गाबाईंचा उल्लेखही करत नाहीत (मी स्वतः ते पुस्तक दोन-तीन वेळा कव्हर-टू-कव्हर वाचले आहे. ही पोस्ट लिहताना पुन्हा दोन-तीन वेळा दुर्गाबाईंसाठी चाळले. तुम्हाला काही वेगळे आढळल्यास जरूर कळवा.)... दुर्गाबाई त्यांना, त्यांनी बुद्धाचा ध्यास घेतल्यानंतर- त्याला मी दुसरा टप्पा म्हणतो- खऱ्या अर्थाने 'सापडल्या' असाव्यात आणि मग ते दुर्गाबाईंचे मोठे फॅन झाले...तस पहिल तर दुर्गाबाईंचे जवळपास सर्व लेखन 'अ.श्र.के.' प्रकाशित होण्याच्या आधी झाले होते.

पुढील लेखकांचा  उल्लेखही सारंग त्यांच्या समीक्षेंच्या पुस्तकात करताना मला दिसत नाहीत:  अण्णासाहेब किर्लोस्कर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं वि जोशी (ज्यांची जवळजवळ सर्व पुस्तके आज बाजारात विकत मिळतात), नाट्यछटाकार दिवाकर (दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, सदानंद रेगेंचे आवडते), वसंत सरवटे (केवळ एक लेखक म्हणून, चित्रकार म्हणून तर नाहीच नाही, सरवटेंनी एका वर्तमानपत्राला लिहलेल्या पत्राचा उल्लेख एकदा आला आहे.), गोविंदराव टेंबे (अभिजात संगीताचे भारतातले आघाडीचे समीक्षक आणि एक विचारी म्हणून), 'बहुरुपी'कार चिंतामणराव कोल्हटकर जे सारंगांसारखेच मराठीभाषाप्रभु होते...  त्यांनी हे लेखक वाचलेच नाहीत का?  का 'पहिल्या टप्प्यातील' दुर्गाबाईंसारखे ते त्यांना कधी महत्वाचे वाटले नाहीत?...

द ग गोडशांचा संगीत सौभद्र आणि अण्णासाहेब किर्लोस्करांचे लेखक म्हणून प्रकट झालेल कौशल्य यावरचा लेख: 'शतायुषी सौभद्र' त्यांनी वाचलाच नाही? गोडशांचा उल्लेख थोड्या कुत्सीत पणे 'औदुंबर' कवितेवरच्या लेखात मात्र येतो. याउलट ह ना आपटे, ना सी फडके आणि विसाव्या शतकातील कितीतरी (डझनाने) बऱ्यावाईट मराठी स्त्री-पुरुष लेखकांचे उल्लेख, त्यातील काही पोलिटिकल कऱेक्टनेससाठी, त्यांच्या लिखाणात येतात... काहीही असो, ही दुर्दैवी गोष्ट आहे....

सारंगांच्या गुहेतील मला आवडलेले एक रत्न... त्यांनी लिहलेला मोबी-डिक (१८५१) आणि मराठी वाचक यांचा संबंध:
"...मराठी वाचकांनी तर मोबी डिकसारखी कादंबरी वाचलीच नसती. (त्यांना वांती झाली असती) मोबी डिकमधली काही वर्णनं मोठमोठं व्हेल मासे कापण, भल्या मोठ्या परातीत ते तळण, धुराचा उग्र वास आणि हे सगळं रात्रीच्या काळोखात; अक्षरशः नरकाचं (Hell) वर्णन शाकाहारी वाचकांना 'टू मच' वाटेल..." (Ibid)

खालील अप्रतिम व्यंगचित्र दुसऱ्या एका अर्थाने असे पाहता येईल: कॅप्टन अहाब यांची कॉमेंटरी सुरु आहे...त्यांना थोडा सुगावा लागलाय आपल्या पाठी काय आलय याचा... बेपर्वा शेरेबाजीचे परिणाम महाकाय मोबी-डिक सारखे  मागे लागू शकतात!


कलाकार: Benjamin Schwartz, The New Yorker

* आता हे प्रसिद्ध झाले आहे की श्री. शहाणेंचा लेख त्यांनी श्री. नेमाडेंच्या साथीत लिहला होता.  पहा माझी ऑक्टोबर २७ २०१३ची पोस्ट 'Ashok Shahane Confesses and I Feel Cheated'. 

Friday, April 14, 2017

प्लेटोची बाराखडी, चातुर्वर्ण्य आणि खुनी इतिहास...Plato's Deadly Alphabets...

Today April 14 2017 is 126th birth anniversary of Dr. B R Ambedkar (भी रा आंबेडकर)


Isaiah Berlin, ‘The Crooked Timber of Humanity’, 1959:

“...The view that the truth is one and undivided, and the same for all men everywhere at all times, whether one finds it in the pronouncements of sacred books, traditional wisdom, the authority of Churches, democratic majorities, observation and experiment conducted by qualified experts, or the convictions of simple folk uncorrupted by civilisation – this view, in one form or another, is central to Western thought, which stems from Plato and his disciples...

...In Plato’s republic there is a rigid, unified hierarchy of three classes, based on the proposition that there are three types of human nature, each of which can be fully realised and which together form an interlocking, harmonious whole. Zeno the Stoic conceives an anarchist society in which all rational beings live in perfect peace, equality and happiness without the benefit of institutions. If men are rational, they do not need control; rational beings have no need of the State, or of money, or of law-courts, or of any organised, institutional life. In the perfect society men and women shall wear identical clothes and feed in a ‘common pasture’. Provided that they are rational, all their wishes will necessarily be rational too, and so capable of total harmonious realisation. Zeno was the first Utopian anarchist, the founder of a long tradition which has had a sudden, at times violent, flowering in our own time...”
 
John Gray, 'Plato and the Alphabet' from 'Straw Dogs: Thoughts on Humans and Other Animals', 2007:
"...Writing creates an artificial memory, whereby humans can enlarge their experience beyond the limits of one generation or one way of life. At the same time it has allowed them to invent a world of abstract entities and mistake them for reality. The development of writing has enabled them to construct philosophies in which they no longer belong in the natural world...Plato’s legacy to European thought was a trio of capital letters – the Good, the Beautiful and the True. Wars have been fought and tyrannies established, cultures have been ravaged and peoples exterminated, in the service of these abstractions. Europe owes much of its murderous history to errors of thinking engendered by the alphabet."

Dr. Sarvepalli Radhakrishnan, 'Indian Philosophy: Volume II", 1923:
"...The infinite dwells in all finite man is conscious of this fact. Though he is bound up with an organism which is mechanically determined by the past, the infinite ideals of truth, beauty and goodness operate in him and enable him to choose and strive for their greater expression It is because the infinite Brahman is revealed to a larger extent in human beings that they are entitled to ethical and logical activity..."

Friedrich Nietzsche (1844-1900):
"To be attracted to the Platonic dialogue, this horribly self-satisfied and childish kind of dialectic, one must never have read good French writers — Fontenelle, for example. Plato is boring. In the end, my mistrust of Plato goes deep: he represents such an aberration from all the basic Greek instincts, is so moralistic, so pseudo-Christian (he already takes the concept of "the good" as the highest concept) that I would prefer the harsh phrase "higher swindle" or, if it sounds better, "idealism" for the whole phenomenon of Plato."
"It is still a metaphysical faith that underlies our faith in science—and we men of knowledge of today, we godless men and anti-metaphysicians, we, too, still derive our flame from the fire ignited by a faith millennia old, the Christian faith, which was also Plato’s, that God is truth, that truth is divine.—But what if this belief is becoming more and more unbelievable, if nothing turns out to be divine any longer unless it be error, blindness, lies—if God himself turns out to be our longest lie?"

Dr. B R Ambedkar (1891-1956):

“...Chaturvarnya pre-supposes that you can classify people into four definite classes. Is this possible? In this respect, the ideal of Chaturvarnya has, as you will see, a close affinity to the Platonic ideal. ... The chief criticism against Plato is that his idea of lumping individuals into a few sharply-marked-off classes is a very superficial view of man and his powers. Plato had no perception of the uniqueness of every individual, of his incommensurability with others, of each individual as forming a class of his own. He had no recognition of the infinite diversity of active tendencies, and the combination of tendencies of which an individual is capable. ..Chaturvarnya must fail for the very reason for which Plato's Republic must fail—namely, that it is not possible to pigeonhole men, according as they belong to one class or the other...”


Stephen Cave, AEON, Feb 21 2017:

“... Throughout Western history, those deemed less intelligent have, as a consequence of that judgment, been colonised, enslaved, sterilised and murdered (and indeed eaten, if we include non-human animals in our reckoning) ...

...The story of intelligence begins with Plato. In all his writings, he ascribes a very high value to thinking, declaring (through the mouth of Socrates) that the unexamined life is not worth living. Plato emerged from a world steeped in myth and mysticism to claim something new: that the truth about reality could be established through reason, or what we might consider today to be the application of intelligence. This led him to conclude, in The Republic, that the ideal ruler is ‘the philosopher king’, as only a philosopher can work out the proper order of things. And so he launched the idea that the cleverest should rule over the rest – an intellectual meritocracy...”

भारतात 'सत्यम्, शिवम्, सुंदरम' / 'सुंदर, शिव, सत्य' केंव्हा आणि कुठून आले मला माहित नाही.  पण ते आता खूप लोकप्रिय झाले आहे. त्याचा उदय प्लेटोच्या उक्तीत असावा असे वाटते.  वर डॉ राधाकृष्णन सुद्धा प्लेटोच्या उक्तीचा पुनरुच्चार त्यांच्या ग्रंथात करतात. दुर्गा भागवतांच्या नावावर पण एक पुस्तक आहे: 'सत्यं शिवं सुंदरं', मी ते पाहिल नाहीय.

मी मराठी विश्वकोशात ही त्रिसूत्री शोधली,  त्यावेळी ही प्रमुख नोंद मिळाली: "...प्लेटो असे म्हणतो की, ‘सत्य, शिव सुंदर ही जी जीवनाची अंतिम मूल्ये आहेत, ती समजण्याची अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते, ते शिक्षण होय’..."
त्याशिवाय खालील दोन नोंदी मिळाल्या:


"प्रबोधनकालीन कला:..ॲरिस्टॉटल हा निसर्गप्रमाण मानणारा होता. निसर्ग स्वयंपूर्ण आहे, या जगामधील वस्तूंची सत्त्वे या निसर्गातच सामावलेली आहेत, म्हणून सत्य, शिव, सौंदर्य ही तत्त्वे सर्व ज्ञानविषयक या निसर्गविश्वातच ओतप्रोत भरलेले आहेत, अशा भूमिकेवर प्रबोधनकाळ आला. या निसर्गाचे निरीक्षण करून ज्ञान मिळवावयाचे आणि निसर्गाचे निरीक्षण करून सौंदर्याचा शोध घ्यावयाचा, ही ॲरिस्टॉटलची विचारसूत्रे प्रबोधनकाळात अत्यंत प्रभावी ठरली"

रोमन कॅथलिक पंथ:... दलित, उपेक्षित व गरीब बांधवांच्या मुक्तीसाठी चर्च प्रोत्साहन देते. ही गोष्ट विशेषतः दक्षिण अमेरिकेत दिसून येते. त्याचप्रमाणे ख्रिस्तेतर धर्मियांबरोबर घडून आणलेल्या सुसंवादाद्वारे प्रत्येक संस्कृतीतील सत्यम्, शिवम्, सुंदरमची जपणूक करण्यास चर्च प्रोत्साहन देते. आजच्या काळातील कॅथलिकांची ही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत...”


साने गुरुजी म्हणतात : "...जगात  जे जे काही सुंदर, शिव, सत्य दिसेल ते ते घेऊन वाढणारी ही (भारतीय) संस्कृती आहे..." (भारतीय संस्कृती, १९३७).

मला सानेगुरुजींचे म्हणण अजिबात पटत नाही. जगातील इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणे भारतीय संस्कृतीत सुद्धा अनेक भल्या बुऱ्या गोष्टी आहेत. पण मला त्या तीन शब्दांवर आपली संस्कृती वाढली अस वाटत नाही.

त्या तीन शब्दांचा एकमेकाशी काय संबंध आहे हे मला कधीच कळल नाही. सत्य, शिव, सुंदर या ऍबस्ट्रॅक्ट कल्पना मला पूर्णपणे सापेक्ष वाटतात. जॉन ग्रे वर म्हणतात त्याप्रमाणे त्या ऍबस्ट्रॅक्ट कल्पनां वरून महायुद्धे कशी छेडली जाऊ शकतात (गेली) याची कल्पना मी करू शकतो. ("Wars have been fought and tyrannies established, cultures have been ravaged and peoples exterminated, in the service of these abstractions. Europe owes much of its murderous history to errors of thinking engendered by the alphabet.") डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे प्लेटोंना प्रत्येक मानवाच्या अद्वितीयतेची, मानवाच्या असंख्य वैविध्यतेची पुरेशी कल्पना नव्हती. सत्य, शिव, सुंदर सारख्या कल्पनांवर एकमत होणे अवघड आहे आणि तसे ते करण्यात आले त्यावेळी नरसंहार घडले. 


सत्यं, शिवं, सुंदरं शब्दांवर आधारित दोन गाणी (एक मराठी, एक हिंदी) मात्र आवडतात!



David Hume and Plato conversing
 courtesy: Existential Comics

Thursday, April 13, 2017

बारा ज्यूरी मेम्बरान...12 Hangry Men


60 years ago, on April 13 1957, a great film,  '12 Angry Men', directed by Sidney Lumet was released.

भारतात शेवटची ज्यूरी-ट्रायल १९५९साली झाली : नानावटी मर्डर केस. त्यावर आधारित आणखी एक सिनेमा २०१६साली काढण्यात आला. श्री. अक्षय कुमार यांना त्यातील त्यांच्या भूमिकेसाठी नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी तो सिनेमा बघितला नाहीय व बघणार पण नाहीय. 'ये रास्ते है प्यार के', १९६३ हा सिनेमा मात्र मला बऱ्यापैकी आवडला होता. कै रवींचे संगीत आणि कै  लीला नायडूंच दिसण ह्या त्यातला सगळ्यात मोठ्या जमेच्या  गोष्ट होत्या / आहेत.

American crime story, a TV series that premiered in 2016, shows, among other things, the problems, to put it mildly, with a jury trial.  It's tragicomic to watch the way system comes apart as the days go by.



The men and women felt like hostages at the hotel - and were treated that way by some of the deputies
courtesy: FX  network and Daily Mail, UK

12 Angry Men is a trial film that tells the story of a jury made up of 12 men as they deliberate the guilt or acquittal of a defendant on the basis of reasonable doubt.

Here is a cartoonist's take on the film. 

Which is better? The cartoon or the film? (खालील चित्रातील उभे गृहस्थ आहेत, उत्कृष्ट काम केलेले, थोडेसे टकले, हेन्री फोन्डा)