Wednesday, September 16, 2026

वसंत सरवटे यांनी केलेले कौतुक आणि दिलेले प्रोत्साहन....I Owe a Lot to Vasant Sarwate

दीनानाथ दलाल आणि वसंत सरवटे आणि त्या खालोखाल रघुवीर मुळगावकर आणि शि द फडणीस ह्यांची चित्रे पहात मी लहानाचा मोठा झालो (नंतर R K Laxman वगैरे आले) ....मला चित्रे काढता येत नाहीत पण मी विचार चित्रांत करतो , चांगले चित्र मला लवकर सोडत नाही .... ते त्याची वेगवेगळी अंगे दाखवते....  

हा ब्लॉग माझ्या आईच्या मृत्यूनंतर मन अस्वस्थ असणाऱ्या काळात २००६ साली सुरु झाला आणि त्याला सगळ्यात जास्त प्रोत्साहन कै वसंत सरवटे यांनी प्रत्यक्ष भेटीतून आणि फोनवरून दिले ..... 

परवा मधुकर धर्मपुरीकरांनी त्यांचे एक पुस्तक पाठवले , त्यातील हे वाचून अगदी ओशाळगत झालो ....विशेष म्हणजे वसंत सरवटे यांनी हे २००९ सालीच लिहले होते....

वसंत सरवटे पत्र , दिलीप माजगावकर यांना लिहलेले ,तारीख २० फेब्रुवारी २००९:
 
"....मी आणि अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यात 'रेषालेखक'संबंधी झालेला ईमेलवरचा पत्रव्यवहार तुम्ही वाचलाच आहे. त्याच संबंधातला त्यांचा ब्लॉग http://sarchingforlaugh.blogspot.com जरूर पहा. व्यंगचित्रांकडे पाहण्याचा त्यांचा एक संपूर्ण स्वतंत्र वेगळा दृष्टिकोण आहे. आपल्याकडे unconventional वाटेल असा. पण त्यांचा व्यंगचित्रांचा तसाच मराठी साहित्याचाही दीर्घकाळ व सखोल दृष्टीनं, अहोरात्र म्हणावा असा सातत्यानं जोपासलेला छंद/अभ्यास आहे. व्यंगचित्रांच्या बाबतीत ते आपल्या धर्मापुरीकरांच्या गोत्राचे आहेत. त्यांनी मांडलेली सर्व मतं तुम्हाला पटो वा न पटो, पण व्यंगचित्र-प्रेमिकानं त्यांचा वरील ब्लॉग जरूर पाहावा. त्यात प्रामुख्यानं 'न्यू यॉर्कर'मधील, पण इतरही व्यंगचित्रांचा समावेश असतो...."
 
(पृष्ठ १७,१८, 'रेषालेखकाची पत्रे', संपादन : मधुकर धर्मापुरीकर, वसंत सरवटे यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रकाशित झाले २०२६-२०२७)
 
 

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.