वाबी साबी हा जपानी शब्द आहे , त्याचा अर्थ आहे असे जीवन जगणे ज्यात अपूर्णत्वात सौन्दर्य दिसते आणि विकास आणि संहार या दोन्ही नैसर्गिक चक्रांचा स्वीकार केला जातो...
"Wabi sabi is a beautiful Japanese concept that has no direct translation in English. Both an aesthetic and a worldview, it connotes a way of living that finds beauty in imperfection and accepts the natural cycle of growth and decay..."
तुम्ही मोरगावचा अष्टविनायक पहिला असेल तर त्या समोरचा नंदी (गणपती समोर सहसा नदी नसतो) असेच एक अत्यंत महान (माझ्या मते) वाबी साबी शिल्प आहे ...(द ग गोडसे यांनी त्यावर विस्ताराने लिहले आहे, माझी ब्लॉगपोस्ट सुद्धा त्यावर आहे https://searchingforlaugh.blogspot.com/.../11/wabi-sabi.html)...
असेच एक अत्यंत थोर वाबी साबी चित्र आज येथे देतो आहे , त्याचे नाव आहे "The Painter’s Daughters With a Cat", कलाकार :Thomas Gainsborough, साधारण : १७६०-६१ ...
ह्या चित्रावरून नजर हटत नाही , चित्रातील दोन मुली चित्रकाराच्या आहेत - मेरी (उजवीकडची , मोठी)आणि मार्गारेट , त्यांच्या डोळ्यांतील भावना आणि चमक पहा , आजही २५० वर्षांनंतर जिवंत आहेत (मला राजकपूरच्या 'बूट पॉलिश' सिनेमातील भाऊ बहीण आठवले.)...
हे चित्र अपूर्ण आहे , मला तर मांजर जेमतेम दिसले किंवा नाहीच म्हणा ("Most of the painting, apart from the girls' faces, is unfinished, displaying loose, expressive brushwork. This has led to a "feathery" appearance in the background that some interpret as suggesting storm clouds or woodland. The cat itself is barely sketched in the lower right, making it difficult to spot at first glance.")...
असे म्हणतात, चित्रकाराला वाटत होते की आपल्या मुली पुढे व्यावसायिक कलाकार होतील , पण नियती मोठी असते , मेरी मोठेपणी मानसिक दृष्ट्या अस्थिर झाली आणि मार्गारेट ने तिला सर्वोतपरी सांभाळले आणि मार्गरेट च्या १८२० सालच्या मृत्युपर्यंत त्या एकत्र रहात होत्या...

No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.