#GinaLollobrigida
Luigina "Gina" Lollobrigida tuns 95 today, July 4 2022

जी. ए. कुलकर्णी:
"...Ingrid Bergmanदेखील
अविस्मरणीय आहे. आणखी
एक नाव आठवते,
पण आता ते
वापरू नये असे
वाटते: Gina Lollobrigida. जणू ती
त्याची खासगी दौलत असल्याप्रमाणे
इतर कुणी तिचा
उल्लेख केला, की (माधव)
आचवल काय भडकत
असे!..."
(पृष्ठ १८९, 'जी
एंची निवडक पत्रे',
खंड १, १९९५)
जी. एं.
नी मिस
लोलोब्रिगिडा यांचा उल्लेख आपल्या
पत्र व्यवहारात आचवलांच्या
निमित्ताने किमान आठ-दहा वेळा केला आहे!
याच मिस लोलोब्रिगिडांनी 'शालिमार', १९७८ नावाच्या अत्यंत भिकार हिंदी सिनेमात (मी बघितलाय तो!) काम करण्यासाठी करार केला होता (मला ते अगदी लहानपणच चांगल आठवतय) पण त्या सुदैवाने त्यातून बाहेर पडल्या. माधव आचवल (१९२६-१९८०) यांना या घटनेचा नक्कीच आनंद झाला असेल.
एका फेसबुक ग्रुप मुळे मला मिस लोलोब्रिगिडा यांचे असंख्य फोटो आणि काही विडिओ बघायला मिळाले. त्यानंतर मी त्यांचा "Come September", 1961 हा सिनेमा सुद्धा पहिला. मला त्या सामान्य (विशेषतः इन्ग्रिड बर्गमन यांच्या तुलनेत) वाटल्या. काय जादू केली होती त्यांनी आचवलांवर कुणास ठाऊक!
पण तत्कालीन आवडी-निवडी अशाच असतात. त्याला कशाचीच फुटपट्टी लागत नाही. अभिजात कला, कलाकार मात्र दीर्घकालीन आनंद देतात.