Monday, July 04, 2022

जी. एंच्या मते माधव आचवलांची जणू खासगी दौलत...Gina Lollobrigida @95

#GinaLollobrigida
Luigina "Gina" Lollobrigida tuns 95 today, July 4 2022

जी. . कुलकर्णी:
"...Ingrid Bergmanदेखील अविस्मरणीय आहे. आणखी एक नाव आठवते, पण आता ते वापरू नये असे वाटते: Gina Lollobrigida. जणू ती त्याची खासगी दौलत असल्याप्रमाणे इतर कुणी तिचा उल्लेख केला, की (माधव) आचवल काय भडकत असे!..."
 (पृष्ठ १८९, 'जी एंची निवडक पत्रे', खंड , १९९५

जी. एं. नी  मिस लोलोब्रिगिडा यांचा उल्लेख आपल्या पत्र व्यवहारात आचवलांच्या निमित्ताने किमान आठ-दहा वेळा केला आहे!

याच मिस लोलोब्रिगिडांनी 'शालिमार', १९७८ नावाच्या अत्यंत भिकार हिंदी सिनेमात (मी बघितलाय तो!) काम करण्यासाठी करार केला होता (मला ते अगदी लहानपणच चांगल आठवतय) पण त्या सुदैवाने त्यातून बाहेर पडल्या. माधव आचवल (१९२६-१९८०) यांना या घटनेचा नक्कीच आनंद झाला असेल.  

एका फेसबुक ग्रुप मुळे मला मिस लोलोब्रिगिडा यांचे असंख्य फोटो आणि काही विडिओ बघायला मिळाले. त्यानंतर मी त्यांचा "Come September", 1961 हा सिनेमा सुद्धा पहिला. मला त्या सामान्य (विशेषतः इन्ग्रिड बर्गमन यांच्या तुलनेत) वाटल्या. काय जादू केली होती त्यांनी आचवलांवर कुणास ठाऊक!

पण तत्कालीन आवडी-निवडी अशाच असतात. त्याला कशाचीच फुटपट्टी लागत नाही. अभिजात कला, कलाकार मात्र दीर्घकालीन आनंद देतात. 


 

as Sheba, poster of ‘Solomon and Sheba’, 1959

courtesy: United Artists

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.