Wednesday, December 08, 2021

सुंदर ताता झाले ...आणि त्या नंतर आले नाशिकचे ९४वे मराठी साहित्य संमेलन...My Late Father and Literary Meet

कवी गोविंद (गोविंद त्रिंबक दरेकर):

"सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार !

सुंदर मी होणार । हो । मरणाने जगणार ।धृ.।

..." 

(ता. क. बहुजन समाजात जन्माला आलेले कवी गोविंद यांचे उचित  स्मारक नाशिक येथे व्हावे म्हणून माझ्या वडिलांनी प्रचंड प्रयत्न केले होते.)  

माझे वडील ऑक्टोबर २२, २०१९ रोजी नाशिकला वारले , १९७४ साली ते नाशिक ला नोकरीनिमित्त आले आणि तेथेच राहिले.

लहानपणापासून त्यांनी कायम वेगवेगळ्या प्रकारचे सतत लेखन आणि त्या निमित्ताने वाचन, दर्शन, श्रवण केले. नाशिकला आल्यावर तर त्यांची लेखणी कायम चालत राहिली. 

त्यांनी अनेक वर्षे गावकरी दैनिकात संपादकीय लिहले. त्यामुळे अनेक नाशिककरांशी त्यांचे जवळचे संबंध आले जसे कुसुमाग्रज, दादासाहेब पोतनीस, वसंत कानेटकर, ना वा टिळक आणि लक्ष्मीबाई टिळकांचे वंशज इत्यादी. 

त्याकाळात तिथे आलेलं विषय हे कित्येक बाबतीत "पुढल्या हाका" ठरले. एक दोन उदाहरणे - सुलभ शौचालय, शरद जोशींचे शेतकरी आंदोलन, करमरकर वि. करमरकर (म्हणजे Kramer Vs. Kramer), जयपूर फूट वगैरे, वगैरे. 

मी नाशिकला १-२ वर्षे राहिलो. त्याकाळात मी शेजवलकरांचा लेखसंग्रह हे ह वि मोटे प्रकाशनाचे दुर्मिळ पुस्तक मिळवले. ते तातांनी बारकाईने वाचून त्या संबंधाने एक-दोन लेख लिहले.

त्यांचे मित्र आणि सुहृद श्री भानबा (नरहरि) भागवत आणि श्री बेदरकर (दोघेही त्यांच्या सानिध्यात पहिल्यांदा 'गावकरी' समूहामुळे आली) यांना वाटले की संमेलनानिमित्त जी स्मरणिका प्रसिद्ध होणार आहे त्यात 'सरांचे' नाव आणि थोडे कर्तृत्व आले पाहिजे. 

माझ्या मदतीने एक टीपण स्मरणिकेत प्रसिद्ध झाले, ते सोबत पहा 


 (काही त्रुटी ह्यात आहेत)

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.