Monday, May 17, 2021

दि के बेडेकरांचे चित्रवेध; पण चित्रपटवेध का नाही?...D K Bedekar's Love of Visual Arts and Socialist Realism

 दि के बेडेकर: "... माणसे मोठी होतात,शिकतात  आणि आंधळीही होतात..." (अनिल अवचट, 'बेडेकर आणि मी', मौज, दिवाळी , २००३)

सुधीर बेडेकर: ”…तसेच ते स्वत: पुन्हा चित्रकलेकडे वळल्याचेही दिसत नाही. याला अपवाद एकच होता तो म्हणजेविचित्रांची निर्मिती. तुरूंगवासानंतरही ती अखंड चालू राहिली. या पुस्तकातील लेखांवरून त्यांच्या या छंदाची चांगली कल्पना येते. ही शिल्पकला अशा स्वरुपाची होती की ती फावल्या वेळात, येताजाता करण्याजोगी होती, अत्यल्प खर्चाची होती तिला फारशा साधनसामुग्रीची गरज नव्हती. भोवतालच्या वस्तुजाताकडे कलावंताच्या दृष्टीतून पहाण्याचीच काय ती गरज होती. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कलेमध्ये परिसरातल्या इतर माणसांना, विशेषत मुलांना, सहज सामावून घेता येत असे. त्यात सर्जनशीलता असे, गंमत असे, आनंद प्रेम भरलेला संवाद असे…”

कै बेडेकरांचा उल्लेख या ब्लॉग वर पूर्वी अनेक  वेळा आला आहे . काही उल्लेख देतो. 

मे १३ २०२०: "... My father (1936- 2019), wrote  a Marathi social novel (सामाजिक कादंबरी): 'Dhoka, Hamrasta Pudhe Aahe!' (धोका, हमरस्ता पुढे आहे!) that was published in 1963 (शके १८८४). The subtitle read: '(अत्यंत प्रक्षोभक आणि अपूर्व सामाजिक कादंबरी)/ [फक्त प्रौढांसाठी]'. 
As I have said elsewhere on this blog earlier, the book was attacked by the likes of Jaywant Dalvi (जयवंत दळवी) but the right of my father to write it was defended by the likes of D K Bedekar (दि के बेडेकर)..."

मे ५ २०१८: "... असाच एक कार्लचा सच्चा अनुयायी म्हणजे मला दि के बेडेकर वाटतात. वर दिलेले त्यांचे quotation वाचा....  इतका आशावाद, इतका भाबडेपणा, इतका सज्जनपणा, इतकी सचोटी...आज जगभर कम्युनिझम कोलमडून पडला असला तरी हेलावून टाकते... (btw बा सी मर्ढेकरांच्या कवितांचे सुंदर परिक्षण करणारे दि के बेडेकर जीए म्हणतात - "ठोकळ्यावर ठोकळे ठेवलेली आकृती काढली की पुरे"- तसे अजिबात नव्हते!)..."

जुलै २८ २०१४: "... Critic D K Bedekar (दि के बेडेकर) writes with some indignation: "...'दोन युद्धे जमा झाली' या चार शब्दांत कोट्यावधी भारतीयांच्या, नव्हे सर्व मानवजातीच्याच वेदनांचे व मृत्यूचे ब्रह्मांड सामावलेले आहे. पण मर्ढेकर परमहंसगतीला पोहोचलेले असल्यासारखे आहेत ! त्यांच्या कालप्रवाहाला मनुष्यांच्या सुखदुःखांचे मोजमाप लागत नाही. नुसते पावसाळे येतात नि जातात हीच कालगणना !..."  ('साहित्य : निर्मिती व समीक्षा', 1954 / 2008)

बेडेकरांचे नवे पुस्तक 'चित्रवेध' मे २०२१ मध्ये प्रकाशित झाले. मुखपृष्ठावरील चित्र बेडेकरांचे आहे.


तो कार्यक्रम झूम वर झाला ज्याला सुधीर बेडेकर, हरिश्चंद्र थोरात, वसंत डहाके,  चित्रकार सुधीर पटवर्धन आदी उपस्थित होते. 

डहाके यांनी बेडेकरांनी केलेल्या दोन शिल्पांच्या (व्याघ्र शिल्प आणि गोमतेश्वर) रसग्रहणाबद्दल सांगितले. 

सुधीर पटवर्धनांनी चित्रांबद्दल आणि विचित्रांबद्दल (निसर्गशिल्पे) सांगितले, 

थोरातांनी हेगेल च्या विचाराच्या (मार्क्सच्या नाही) पगड्याबद्दल तसेच  मराठीतील बालकवी, केशवसुत यांची (आणि मर्ढेकरांची नव्हे) रोमँटिक कविता कशी बेडेकरांना आवडायची याबद्दल सांगितले.... 

विकिपिडिया सांगतो: "... Maxim Gorky, a proponent of literary socialist realism, published a famous article titled "Socialist Realism" in 1933. During the Congress of 1934, four guidelines were laid out for socialist realism. The work must be:

    Proletarian: art relevant to the workers and understandable to them.

    Typical: scenes of everyday life of the people.

    Realistic: in the representational sense.

    Partisan: supportive of the aims of the State and the Party...."

बेडेकरांची मला बघायला मिळालेली बरीच चित्रे वरील पहिल्या तीन वर्गांत बसतात.  (त्यांची आवडती मराठी रोमँटिक कविता बहुदा चौथ्या वर्गात बसते.)      

पण या सगळ्यामध्ये  ऐकू  काय आले नाही तर - १९५० च्या दशकातील हिंदी चित्रपटकलेबद्दल बेडेकरांना काय वाटत होते ते ...

हिंदी चित्रपट ही त्याच्या जन्मापासून सामान्य लोकांची अतिशय आवडती कला ... ultimate Proletarian...१९५०चे दशक म्हणजे तीचा सुवर्णकाळ ...मग बेडेकर इतर 'प्रतिष्ठित' साहित्यकांसारखेच त्याबाबतीत गप्प का? ती फक्त करमणूक आहे म्हणून? 

प्रोलेटरीयन दो बिघा जमीन, १९५३ सारख्या सिनेमांच्या बरोबरीने, समाजवादी स्वप्नांची स्वतंत्र भारतात अवस्था अवघ्या दहा वर्षांत काय झाली हे दाखवणारा जागते रहो, १९५६  सारखा सिनेमा त्यांना माहित नव्हता  काय?

"बेडेकर" 

कलाकार : (बहुदा) अनिल अवचट , मौज , दिवाळी २००३

2 comments:

  1. चित्रपटवेधाचा मुद्दा रास्त आहे.
    बेडेकरांच्या चेहऱ्याचं पोस्टमधे आलेलं (मौज, दिवाळी २००३) रेखाटन अवचटांऐवजी बहुधा बाळ ठाकुरांनी केलेलं असावं. रेषांवरून आणि एकंदर धाटणीवरून तसं वाटतं, आणि ते बहुतेकदा या अंकांमधल्या चित्रांसोबत सही करायचे नाहीत, म्हणूनही.

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.