मिरजेला लक्ष्मी मार्केटच्या भागात नेहमी दिसणारे प्राणी म्हणजे देवाला/ दर्ग्याला सोडलेले बोकड. त्यांचा कोणी मालक नसे. त्यांना कोणी मारून खाण्याची भीती नसे. त्यांचे सर्व आयुष्य मिरजेच्या रस्त्यांवर जाई.
मिरज पोस्टाच्या शेजारी (शेट्टींचे?) धान्याचे मोठे दुकान होते. तिथे रस्त्याच्या बाजूलाच उघडलेली धान्याची पोती, गुरांना खायला घालण्यात येणाऱ्या गोष्टी, गुळाच्या ढेपा वगैरे असत. देवाच्या बोकडांना त्या पोत्यात तोंड घालणे या कृती सारखा आनंद दुसऱ्या कुठल्या गोष्टीने होत नसावा. (त्यांना मेटींग करताना पाहिल्याचे फारसे आठवत नाही.) त्यांना हाकलण्यासाठी त्या दुकानात एक सोटा वजा काठी ठेवलेली असे.
ते अर्थात कुठेही तोंड घालत (उदा: भाजीपाला, मोड आलेली कडधान्ये, मंगळवारच्या लोणीबाजारात लोणी/दही) आणि ते इतके मोठे झालेले असत की त्यांची भीती वाटे. शिवाय ते देवाला सोडलेले असल्याने लोक त्यांना फार इजा पोचवत नसत. ते जवळ आल्याचे अर्थात फार लवकर समजे कारण त्यांचा उग्र वास त्यांच्या दर्शनाच्या आधी पोचत असे. तो वास माझ्या नाकपुड्यांत अजून भरून आहे!
काही असो त्या बोकडांनी माझा खूप टाईमपास केला आहे ....कधीतरी त्यांचा किंचित हेवा वाटल्याचेही आठवते...
हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे 'दि गार्डियन' जुलै २०१७ मध्ये प्रकाशित झालेला, मला आवडलेला, बोकडांवरचा photo essay. .
‘They seem to have a personality. Perhaps they do – and the photograph lets us see it. Or perhaps the language of the photo creates the impression of a personality’
असे पुष्कळ सिडनी मी माझ्या २१वर्षाच्या मिरजेतील वास्तव्यात पहिले आहेत! हो, त्यांना व्यक्तीमत्व नक्कीच होते... आणि वास...

Sydney by Artist: Kevin Horan
‘They seem to have a personality. Perhaps they do – and the photograph lets us see it. Or perhaps the language of the photo creates the impression of a personality’
असे पुष्कळ सिडनी मी माझ्या २१वर्षाच्या मिरजेतील वास्तव्यात पहिले आहेत! हो, त्यांना व्यक्तीमत्व नक्कीच होते... आणि वास...
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.