Monday, January 13, 2020

पिवळीच मी पाकोळी की, शेख झैनुद्दिन यांच्या कले मध्ये मी आहे की...Durgabai, Moths and Forgotten Indian Artists

दुर्गा भागवत:
"...क्रौंचवध पाहून ज्याचा शोक श्लोकत्व पावला, त्या वाल्मिकीला फुलपाखरू दिसले नाही, मग इतरांना तरी कसे दिसावे?...आणि व्यासाचे उच्छिष्ट खाणारे आम्ही? व्यासाची प्रज्ञा तर घालवून बसलोच, पण आमची प्रतिभाही आटली… मानवी अंतरंग असो किंवा बाह्य सृष्टी असो, प्रकृतीचे आकलन, व तेही सूक्ष्म असल्याशिवाय,  कल्पना उंचावत नाहीत,  भावना संयत होत नाहीत. विभूषित होत नाहीत. आणि म्हणूनच फुलपाखरांचा अभाव हा भारतीय साहित्याच्या अनेक अभांवाचा प्रातिनिधिक अभाव आहे असे मला वाटते… "
(“पिवळीच मी पाकोळी की”/ निसर्गोत्सव, १९९६)

दुर्गाबाईंच्या वरील उद्गाराबद्दल मी या ब्लॉगवर पूर्वी बऱ्याच वेळा लिहले आहे. पण डिसेंबर २०१९ मध्ये मला हे अतुलनीय असे चित्र बघायला मिळाले:


'Brahminy Starling with Two Anteraea Moths, Caterpillar and Cocoon in Indian Jujube Tree’, १७८० ,

© Minneapolis Institute of Art

 कलाकार: Shaikh Zain ud-Din  हे  बंगाली होते...सांगायची गोष्ट तुम्ही दोन पाकोळ्या चित्रात पाहू शकता! -  

१७८० सालचे हे चित्र आहे. मग ह्या इसवी सनाच्या सुरवातीपासूनच्या परंपरेचे काय झाले?

विल्यम डालरिम्पल लिहतात : "...Their paintings, often of astonishing brilliance, and possessing a startlingly hybrid originality, represent the last phase of Indian artistic genius before the onset of the twin assaults — photography and the influence of western colonial art schools — ended an indigenous tradition of painting going back 2,000 years...."


No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.