Thursday, December 19, 2019

Om Prakash@100

#OmPrakash100

Today December 19 2019 is 100th birth anniversary of Om Prakash (1919-1998), one of my favourite actors of Indian cinema.

कै ओम प्रकाश माझे खूप आवडते नट होते. त्यांचा 'चुपके चुपके' , १९७५ मधला अभिनय हिंदी सिनेमा विनोदाची कोणती उंची गाठू शकतो हे आपल्याला दाखवून देतो. हिंदी सिनेमातील सर्व नट-नट्यांसारखे ते सुद्धा टाईपकास्ट झाले होते पण तरी ते मधूनच आपल्या टॅलेंटची चुणूक दाखवत.

'बुड्ढा मिल गया', १९७१ हा सिनेमा अगदी  शेवट पर्यंत अतिशय इंटरेस्टिंग राहतो त्यांच्या अभिनयामुळे. 

कै श्रीलाल शुक्ल यांच्या 'राग दरबारी', १९६८ वरती एक चांगली टीव्ही सिरीयल निघाली (१९८६) पण त्यावर सिनेमा निघाला असता (आणि निघायला पाहिजे होता) तर त्यात ओम प्रकाश यांना महत्वाची भूमिका मी तरी दिली असती.

ओम प्रकाश यांनी बहुदा आत्मचरित्र लिहले नाही. ते लिहले असते तर कोणत्याही गॉसिप शिवाय ते एक वाचावेसे पुस्तक झाले असते असे मला कायम वाटत राहिले आहे कारण ते मनुष्य म्हणून सुद्धा खूप इंटरेस्टिंग असावेत अस मला उगाचच वाटत आले आहे. 


As Girdharilal in Hrishikesh Mukherjee's 'Buddha Mil Gaya', 1971

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.