#NormanRockwell125 आज नॉर्मन रॉकवेल (जन्म १८९४) आणि वसंत सरवटे (जन्म १९२७) या दोघांची जन्मतिथी आहे.
John Updike, ‘Always Looking: Essays on Art’:
“...this (Norman Rockwell) most successful of
twentieth-century commercial artists also practiced art for art’s sake....”
अगदी हेच वर्णन
दीनानाथ दलालांना लागू होत....महाराष्ट्रातील most successful of
twentieth-century commercial artists also practiced art for art’s sake....
शि द फडणीसांवरती
मला रॉकवेल यांचा
खूप प्रभाव जाणवतो...
माझ्या मते भारतातील
सामान्य जीवनाचे चित्रण करणारी,
त्यात विनोद शोधणारी
अशी फडणीसांची अनेक
चित्रे रॉकवेल
यांच्या उत्तम चित्रांच्या दर्जाची
आहेत...
पण ,फडणीसांची अद्भुतता रॉकवेल
यांच्या चित्रात जवळपास नाहीच...
फडणीसांची चित्रकारिता सुद्धा बरीच
वेगळी आहे...
Deborah Solomon:
“Rockwell had celebrated the small
and local, not the global and cinematic. But the emphasis on the common man
that was central to America’s sense of self in 20th-century America gave way,
in the television-centered 1960s, to the worship of celebrities, whose life
stories and marital crises replaced those of the proverbial next-door neighbor
as subjects of interest and gossip.”
आणि जे अमेरिकेत
झाल, तेच भारतात
झाल ... "the worship of
celebrities, whose life stories and marital crises replaced those of the
proverbial next-door neighbor as subjects of interest and gossip"...
Marriage License, June 11, 1955
Christopher Finch, 1988:
"There can be little doubt that this is one of Rockwell's
finest
works. The idea behind it is
simple enough: The artist contrasts the young couple applying for a marriage
license with the elderly clerk who has seen it all a thousand times before. But
the scene is evoked with such affection that it becomes suffused with complex
resonances. The old clerk occupies an office that, like him, seems to belong to
the past. It contains rows of dusty volumes and an ornate potbellied stove.
Paint is peeling from the dingy walls and cigarette butts are scattered on the
floor. But the tall sash window lets in the early-summer light, which falls on
the young couple, bathing them in its glow and causing them to stand out from
their surroundings. Their concentration on the task at hand is such that the
surroundings have no meaning for them anyway. In this composition the play
ofdarkness and light is used both to create the architecture of the painting
and to produce an emotional effect on the viewer. Everything about this
painting seems just right. Artists are notoriously critical of their own work,
but in this instance it is impossible to think that Rockwell cannot have been
satisfied with the result of his labors."
The Grocer’s Shop: a Woman Selling Grapes, 1672,
Artist: Gerrit Dou (1613-1675)
नॉर्मन रॉकवेल यांचं चित्र आणि खालचा ख्रिस्तोफर फिन्च यांचा उतारा, हे दोन्ही आवडलं. उताऱ्यात नमूद केलेल्या गोष्टी तर आहेतच, शिवाय ती मांजर आणि सही करण्यासाठी रॉकवेल यांनी निवडलेली जागा, हे दोन घटकही संवेदनशील वाटले.
ReplyDeleteया ब्लॉगवरची काही मतं मला पटत नाहीत- काही वेळा ती एकांगी किंवा दुराग्रही वाटतात, पुरेशी तथ्यांवर आधारित वाटत नाहीत. किंवा एक गोष्ट नको, असं म्हणताना दुसऱ्या गोष्टीला थोडं झुकतं माप दिलं जातं की काय, असंही काही वेळा वाटतं. पण काही गोष्टी पटत राहातात, विशेषतः अशी चित्रं/व्यंग्यचित्रं, त्यांच्याकडे बघण्याची इच्छा, त्यांचा अर्थ लावण्याची इच्छा, आपल्या वातावरणाशी ते जोडण्याची इच्छा, हे चांगलं वाटतं. शिवाय, काही मतं पटत नाहीत, हे मांडण्याची माझी इच्छा मी इथे अंमलात आणू शकतोय, हेही चांगलं वाटतं. चित्रावरच्या प्रतिक्रियेत हे नोंदवायची गरज नव्हती बहुधा. पण फार न अडखळता नोंदवतो आहे. मागे एकदा प्रतिक्रिया टाकताना बराच वेळ 'रोबोट' नसल्याचं सिद्ध करायला कोडी सोडवत राहावं लागलं, त्यामुळं कंटाळून प्रतिक्रिया डिलीट केली किंवा टाकलीच नाही, असं झालं होतं. पण आज हे चित्र अनेकदा पाहून प्रतिक्रिया नोंदवावी वाटली. वेगवेगळ्या प्रकारे फक्त स्वतःला सिद्ध करू पाहणारा आवाजी अवकाश सगळ्या बाजूंनी वाढत असताना हे चित्र बघून बरं वाटलं. आपोआप बऱ्याच गोष्टींची जाणीव ठेवणारं चित्र आहे. (असं इथली इतरही काही चित्रं/व्यंग्यचित्रं पाहून वाटलेलं आहे. त्यामुळे ही प्रतिक्रिया तशी अनेक पोस्टना एकत्रितरित्या समजता येईल अशी आहे). शुभेच्छा.
थँक्स अवधूत.
ReplyDeleteमला तुमच्या फीडबॅक मध्ये एक गोष्ट आवडती आणि ती म्हणजे तुम्ही मला माझ्या पोस्टचा डिफेन्स करायचा आग्रह धरत नाही. बरेच लोक ते करतात.
मला काय म्हणायचय ते मी लिहून गेलोय, आता ते वाचणाऱ्याला म्हणायचा अधिकार आहे. या पलीकडे कसलीच बांधिलकी नाही. एखादी गोष्ट फॅक्च्युअली चुकली असेल तर ती अर्थातच बदलली पाहिजे, बस्स.
मी लिहलेली एकही गोष्ट मला "एकांगी, दुराग्रही किंवा पुरेशी तथ्यांवर आधारित नाही" अशी वाटत नाही. पण तुम्हाला ती वाटत असेल तर तेही ठीकच आहे.
थँक्स पुन्हा एकदा.
या पोस्टमधे ते माझं जनरल मत नोंदवावं की नाही, हे मी पक्कं ठरवलं नव्हतं. अशी मतभिन्नता बहुधा स्वाभाविक असेल. आणि माझ्याही काही मर्यादा असतील. इथे मुख्यतः त्या चित्राबद्दल आभार मानणं, हा प्रतिक्रियेचा हेतू. पण मनात आलं ते सहज नोंदवलं. शिवाय, अशी प्रतिक्रिया नोंदवता येते, हीसुद्धा माझ्यापुरती चांगली वाटणारी गोष्ट आहे. असं कुठे खूप ठिकाणी करता येतं!
ReplyDelete