ह्या शतकाच्या जवळजवळ प्रारंभी पासून मी मराठी साहित्याला/ सर्व इतिहासाला
प्रचंड मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशनची तातडीची गरज आहे हे सांगत आहे...
ह्या ब्लॉग वर त्या स्वरूपाचे लेखन जागोजागी आहे....
मराठीतील कित्येक दिवंगत आणि जिवंत लेखक, मासिके, वर्तमानपत्रे, विचार, चित्रे टिकायचे असतील तर इंटरनेट वर उपलब्ध होणे आवश्यक आहे...'वाङ्मय शोभा', 'माणूस' च्या पाठोपाठ सत्यकथा, मौज, ललित यांचे सर्व अंक उपलब्ध होणार असे ऐकून आहे ... हे अत्यंत स्वागतार्ह आहे....
पण त्यातील प्रत्येक गोष्ट searchable पाहिजे ... उदा: बुकगंगा वरचे 'वाङ्मय शोभा' चे अंक searchable नाहीयेत .... त्यामुळे गुगल सर्च मध्ये 'वाङ्मय शोभा' मधील result केंव्हाच येत नाही... आवडो न आवडो, विकिपीडिया आणि गुगल जे विसरत, ते हळूहळू सगळे विसरतात!
मराठी वर्तमानपत्रे, काही मासिके याबाबत बोटचेपी भूमिका घेत आहेत कारण त्यातील बरेच जण ब्लॉग, विकिपीडिया, फेसबुक, व्हाट्सएप यांना आपला प्रतिस्पर्धी मानायला लागले आहेत. त्यामुळे ते त्यांचा बऱ्याचदा उल्लेख सुद्धा करत नाहीत. (इंग्रजी मधील प्रसिद्ध वर्तमानपत्रे, छापलेली मासिके मात्र त्यांचा उल्लेख आता जास्त करायला लागले आहेत.)
मराठी वर्तमानपत्रांचे भविष्य काय याबद्दल मला काहीही अंदाज नाही पण सध्या त्यांचा एक महत्वाचा उपयोग म्हणजे फेसबुक आणि व्हाट्सएपला फीड किंवा विकिपीडिया बदला साठी संदर्भ म्हणून आहे. म्हणजे बरीच लोक वर्तमानपत्रे फक्त सोशल मीडिया वरती छायाचित्राच्या स्वरूपात पाहतात.
मराठी वर्तमानपत्रांकडून, मराठी लोकांच्या सर्व प्रकारच्या इतिहासाचे जतन करण्या बाबत thought-leadership ची अपेक्षा मी तरी करत नाही. वर्तमानपत्र हा एक व्यवसाय आहे आणि तो त्याप्रमाणे चालवला जातो.
मराठीभाषेला डिजिटायझेशनच्या चळवळीची जास्त गरज आहे कारण सध्या त्यात लिहणारे बरेच जण 'wheel reinvent' केल्याच्या आवेशाने लिहीत असतात. १९-२०व्या शतकात मराठीत विविध विषयावरती प्रचंड लेखन झाले आहे. त्यातले बरेच पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध सुद्धा झालेले नाही. ज्या लेखनाची पुस्तके झाली ती बहुसंख्येने बाजारपेठेतून केंव्हाच नाहीशी झाली आहेत आणि त्यांचे पुनर्मुद्रण व्हायची शक्यता शून्य आहे.
बरीच लोक मला- मी प्रसिद्ध केलेल्या फेसबुक पेजवर- हे पुस्तक कुठे मिळेल असे विचारत असतात. ज्यावेगाने पृथ्वीवरून जीवजाती extinct होत आहेत त्या वेगाने मराठी पुस्तके बाजारातून नाहीशी होत आहेत.... bookganga.com वर कित्येक लेखक सर्च करून पहा.
लिखित शब्दांची ही अवस्था तर चित्रांची काय वर्णावी - त्यांच्या बद्दल तर आधीच उत्साह कमी?
सध्या मराठीत फक्त 'utilitarian' किंवा 'उपयोगी', किंवा 'सुधारणावादी' लेखनाचा, कलांचा उदोउदो करण्याची फॅशन आहे आणि भूतकाळातील फक्त त्याच प्रकारचे लेखन टिकवल्याचा प्रयत्न केला जातो. उदा: महात्मा फुले (१८२७-१८९०) यांचे बहुतांशी लेखन उत्तम स्वरूपात उपलब्ध आहे पण त्यांच्या बहुतेक समकालीनांची परिस्थिती बिकट आहे.
पण हे बदलू शकत.
पुढच्या पिढ्यांना सर्व प्रकारच्या लेखनात इंटरेस्ट वाटू शकतो. त्यांच्या विचाराच्या कक्षा फार मोठ्या प्रमाणात रुंदावू शकतात. मराठी माध्यमांचे सध्याचे बरे-वाईटा चे निकष, उदा : सध्याचा political correctness पूर्वीच्या प्रत्येक गोष्टीला लावण्याची घाणेरडी सवय त्यांना नसू शकते. आपण काहीतरी लिहण्या किंवा बोलण्याआधी इतिहासात अस कोणी लिहिल किंवा बोललय का हे तपासण्याची अभ्यासू सवय त्यांना असू शकते. अशावेळी डिजिटल presence फार उपयोगी पडू शकतो.
Starting August 15 2007, over the past decade and more, I have created a few pages on English Wikipedia:
Vasant Sarwate, T S Shejwalkar, M V Dhond, D G Godse, Y D Phadke, S D Phadnis, Sadanand Rege, Natyachhatakar Diwakar
I have created a few Facebook pages too. Here, I have listed them in alphabetic order showing their number of 'Likes' and/or 'Followers' over the past two years.

Facebook page | Address | Likes as of Dec 29 2016 | Likes as of Dec 25 2017 | Followers as of Dec 9 2018 | %Change in 1 year |
B S Mardhekar& Co बा. सी. मर्ढेकर आणि कंपनी | https://www.facebook.com/myBaSeeMardhekar/?ref=bookmarks | 909 | 1138 | 1193 | 4.8% |
D G Godse, A Search शोध द. ग. गोडसेंचा | https://www.facebook.com/MastaniDaGaGodse/?ref=bookmarks | 356 | 524 | 561 | 7.1% |
Dinanath Dalal (In Marathi: दीनानाथ दलाल) | https://www.facebook.com/artistdinanathdalal/?ref=bookmarks | 2329 | 2509 | 2692 | 7.3% |
Durga Bhagwat An Appreciation दुर्गा भागवत एक आस्वाद | https://www.facebook.com/durgabhagwatappreciation/?ref=bookmarks | 1341 | 1602 | 1739 | 8.6% |
G A Kulkarni, An Appreciation जी ए कुलकर्णी, एक आस्वाद | https://www.facebook.com/myGAKulkarni/?ref=bookmarks | 874 | 1183 | 1302 | 10.1% |
Gopal Dutt Kulkarni गोपाळ दत्त कुलकर्णी | https://www.facebook.com/gopalduttkulkarni/?ref=bookmarks | 3 | 39 | 41 | 5.1% |
Govindrao Tembe गोविंदराव टेंबे | https://www.facebook.com/GovindraoTembe/?ref=bookmarks | 639 | 860 | 861 | 0.1% |
My Sadanand Rege माझे सदानंद रेगे | https://www.facebook.com/mySadanandRege/?ref=bookmarks | 431 | 582 | 607 | 4.3% |
Natyachhatakar Diwakar नाट्यछटाकार दिवाकर | https://www.facebook.com/NatyachhatakarDiwakar/?ref=bookmarks | 78 | 155 | 172 | 11.0% |
R D Karve, Who? र. धों. कर्वे, कोण? | https://www.facebook.com/rdkarve/?ref=bookmarks | 813 | 1071 | 1078 | 0.7% |
Ram Ganesh Gadkari राम गणेश गडकरी | https://www.facebook.com/RamGaneshGadkari/?ref=bookmarks | 1612 | 1842 | 1870 | 1.5% |
Remembering C V Joshi चिं वि जोशींच स्मरण | https://www.facebook.com/ChinViJoshi/?ref=bookmarks | 44 | 164 | 178 | 8.5% |
Setu Madhavrao Pagdi, A View सेतु माधवराव पगडी, मला दिसलेले | https://www.facebook.com/mySetuMadhavraoPagdi/?ref=bookmarks | 963 | 1252 | 1383 | 10.5% |
Shripad Krushna Kolhatkar, The Greatest श्रीपाद कृष्ण कोल्हटकर | https://www.facebook.com/ShripadKrushnaKolhatkar/?ref=bookmarks | 502 | 685 | 708 | 3.4% |
T S Shejwalkar, Lest We Forget त्र्यं. शं. शेजवलकर, विसरलो का? | https://www.facebook.com/HistorianShejwalkar/?ref=bookmarks | 307 | 526 | 598 | 13.7% |
The Art of Vasant Sarwate वसंत सरवटे यांची कला | https://www.facebook.com/vasantsarwateappreciation/?ref=bookmarks | 893 | 1078 | 1093 | 1.4% |
Two Brothers in Tandem-R K - Narayan & Laxman | https://www.facebook.com/Two-Brothers-in-Tandem-R-K-Narayan-Laxman-283141975063419/?ref=bookmarks | 24 | 37 | 40 | 8.1% |
Vilas Sarang, a literary critic विलास सारंग, टीकाकार | https://www.facebook.com/vilassarangcritic/?ref=bookmarks | 305 | 485 | 543 | 12.0% |
Vishwanath Kashinath Rajwade विश्वनाथ काशिनाथ राजवाडे | https://www.facebook.com/VishwanathKashinathRajwade/?ref=bookmarks | 1155 | 1412 | 1462 | 3.5% |
Who was M V Dhond? कोण बर हे म. वा. धोंड? | https://www.facebook.com/MaVaDhond/?ref=bookmarks | 14 | 116 | 159 | 37.1% |
य दि फडके, एक वाटाड्या Y D Phadke, A Guide | https://www.facebook.com/yadiphadkeaguide/?ref=bookmarks | 7 | 204 | 262 | 28.4% |
Total Likes/ Followers for pages | 13599 | 17464 | 18542 | 6.2% |
The image of the data above is below:
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.