Thursday, June 14, 2018

अशी रडायची क्षमता मी केंव्हाच घालवून बसलोय!....I Have Measured Out My Life With FIFA World Cups

 #worldcup
 #fifa

Today June 14 2018, 21st FIFA world cup starts

T. S. Eliot, 'The Love Song of J. Alfred Prufrock'::
".....I have measured out my life with coffee spoons;...."

Brian Cumings:
"...Football is hope against experience, desire against frustration, time captured while time is lost. Perhaps football is not an escape from life, it is like life after all..."  


FIFA set to make $6.1 billion from World Cup 2018
 
 वर्ल्डकप च्या संबंधातील माझी एक अतिशय हृद्य आठवण आहे.  कोरियात झालेला त्यावर्षीच्या कप मधील खेळाचा दर्जा १९७०च्या कप  सारखा उत्कृष्ट होता- (मी १९७० पेले कप live पहिला नाहीये, १९८६पासून सगळे live पाहिलेत, त्या आधीचे सिनेमाच्या आधी Indian news मध्ये थोडे highlights आणि अर्थात  काही वर्षांनंतर TV  वर). कोरियात असल्यामुळे टीव्ही वर पाहायला वेळा सुद्धा भारतासाठी सोयीच्या होत्या.

जून ३० २००२ला  जेंव्हा वर्ल्डकप संपला तेंव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा ढसढसा रडायला लागला. आम्हाला समजेचना. त्याने आणि मी जवळ जवळ जमेल तेवढा कप शेजारी बसून टीव्ही वर पहिला होता.  मग त्याने सांगितले की वर्ल्डकप संपला म्हणून रडू आले! 

मला त्याचा क्षणभर हेवा वाटला.... कारण मला सुद्धा रडू येत होत पण अशी रडायची क्षमता मी केंव्हापासून  घालवून बसलोय!

आणखी एक वर्ल्डकप मधला असा क्षण मुलाच्या संबंधीतलाच आहे. त्याचा जन्म मार्च १९९४ मधला आणि त्यावर्षी वर्ल्डकप होता जून- जुलै मध्ये अमेरिकेत.  जुलै ९ १९९४ ला क्वार्टर फायनल मॅच ब्राझील आणि हॉलंड मध्ये झाली. 

फिफा च्या वेबसाईट वर त्याचे वर्णन असे:
"...The second goal arrived after 64 minutes and this time Bebeto was the scorer. Thinking the backtracking Romario was offside, the Dutch defence paused fatally as the ball was headed back into their half from De Goey's long kick. Bebeto seized the initiative. After evading Wouters' desperate challenge, he rounded the keeper and slotted into the open goal before racing to the corner for a memorable baby-cradling celebration with Romario and Mazinho - in honour of his new born back in Brazil...."

हे जे सेलिब्रेशन झाले ते मी लाईव्ह पहिले आणि मला वाटले माझ्या मुलाला पण बेबेटो झोका देत आहेत...

मध्ये बेबेटो, उजवीकडे रोमेरियो आणि डावीकडे माझीन्हो


Artist: Christopher Weyant, The New Yorker

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.