थॉमस हार्डी यांच्या 'फार फ्रॉम दि मॅडिंग क्राऊड' (Thomas Hardy, 'Far From the Madding Crowd'), १८७४ कादंबरीतले एक वाक्य पहा:
".... “I have always this dreary pleasure in thinking over those past times with you—that I was something to you before he was anything, and that you belonged almost to me. But, of course, that’s nothing. You never liked me.”
“I did; and respected you, too.”
“Do you now?”
“Yes.”
“Which?”
“How do you mean which?”
“Do you like me, or do you respect me?”
“I don’t know—at least, I cannot tell you. It is difficult for a woman to define her feelings in language which is chiefly made by men to express theirs. My treatment of you was thoughtless, inexcusable, wicked! I shall eternally regret it. If there had been anything I could have done to make amends I would most gladly have done it—there was nothing on earth I so longed to do as to repair the error. But that was not possible.”..."
दुर्गा भागवत (१९१०-२००२) त्यांच्या 'पत्रांच्या निसटत्या आठवणी' ('भावसंचित', २०१५ मध्ये समाविष्ट) लेखात आहिल्याबाई होळकर आणि आनंदीबाई पेशवे यांच्यातील पत्र व्यवहाराचा पुनरुल्लेख करतात (पहिला उल्लेख: 'पैस', १९७०).
आहिल्याबाई (१७२५-१७९५) आणि आनंदीबाई पेशवे (१७४? - १७९४) या १८व्या शतकातील देशाच्या राजकारणातील महत्वाच्या स्त्रिया, पण बऱ्याच दृष्टीने भिन्न.
जसा काळ गेलाय तशी आहिल्याबाईंची कीर्ती दिवसेंदिवस वाढत गेलीय. भारताच्या सध्याच्या लोकसभेच्या स्पीकर (श्री. सुमित्रा महाजन) त्यांना मानणाऱ्या लाखो लोकांपैकी एक आहेत. आनंदीबाईंची प्रतिमा मात्र संपूर्णपणे अनैतिहासिक अशा "ध चा मा" प्रकरणाने मलीन झालेली. त्यात त्या पडल्या राघोबा पेशव्यांच्या पत्नी आणि दुसऱ्या बाजीरावांच्या आई.
कै. म वा धोंड आनंदीबाईंबद्दल त्यांच्या एका लेखात काय म्हणतात ते पहा:
आनंदीबाईंचे पत्र आणि त्यावर आहिल्याबाईंची कृती याचे दुर्गाबाईंनी ज्या संवेदनशीलतेने वर्णन केले आहे ते अजोड आहे, दुर्गाबाईंच्याच भाषेत एखाद्या धर्मानुभवासारखा आहे.
आनंदीबाईंनी आपली व्यथा मांडली आणि आहिल्याबाईंनी त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवले. माझ्या मते एक संवेदनशील स्त्रीच ह्याचे त्याला न्याय देणारे वर्णन करू शकते. आनंदीबाईंच भाग्य की त्यांच्या मृत्यनंतर जवळजवळ पावणे दोनशे वर्षानंतर मराठीतील, भारतातील एका सर्वोत्तम लेखकाने त्यांना समजावून घ्यायचा प्रयत्न केला.
ह्या ब्लॉग वरील ऑगस्ट २०, २०१७ ची पोस्ट पहा.
कै. म वा धोंड म्हणतात की "... पुरुष जेंव्हा स्वार्थी, स्वैराचारी , स्त्रैण व भ्याड बनतात , तेंव्हा स्त्रीया राजकारणे करू पाहतात, घराबाहेर पडतात , हातात शस्त्रं धरतात आणि अंती त्यांच्याप्रमाणे बेजबाबदार, उच्छृंखळ, पुरुषी व बदफैली बनतात" ( प्रस्तावना, 'मऱ्हाटी लावणी', १९५६/२००३).
ह्याचे खंडन मी त्या पोस्ट मध्ये केले होते.
आहिल्याबाई आणि आनंदीबाई यांच्यातील परस्पर व्यवहार हे आणखी एक उदाहरण आहे की स्त्रीया राजकारण करू लागल्यावर किती जबाबदारीने, परिपक्वतेने आणि संवेदनशीलतेने वागू शकतात याचे.

'''स्वामी' आणि पेशवेकालीन मराठी". सत्यकथा, जुलै १९६५ / 'जाळ्यांतील चंद्र : समीक्षालेखसंग्रह', १९९४/१९९८
कृतज्ञता: म वा धोंड यांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स आणि राजहंस प्रकाशन, पुणे
आनंदीबाईंचे पत्र आणि त्यावर आहिल्याबाईंची कृती याचे दुर्गाबाईंनी ज्या संवेदनशीलतेने वर्णन केले आहे ते अजोड आहे, दुर्गाबाईंच्याच भाषेत एखाद्या धर्मानुभवासारखा आहे.
आनंदीबाईंनी आपली व्यथा मांडली आणि आहिल्याबाईंनी त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवले. माझ्या मते एक संवेदनशील स्त्रीच ह्याचे त्याला न्याय देणारे वर्णन करू शकते. आनंदीबाईंच भाग्य की त्यांच्या मृत्यनंतर जवळजवळ पावणे दोनशे वर्षानंतर मराठीतील, भारतातील एका सर्वोत्तम लेखकाने त्यांना समजावून घ्यायचा प्रयत्न केला.
ह्या ब्लॉग वरील ऑगस्ट २०, २०१७ ची पोस्ट पहा.
कै. म वा धोंड म्हणतात की "... पुरुष जेंव्हा स्वार्थी, स्वैराचारी , स्त्रैण व भ्याड बनतात , तेंव्हा स्त्रीया राजकारणे करू पाहतात, घराबाहेर पडतात , हातात शस्त्रं धरतात आणि अंती त्यांच्याप्रमाणे बेजबाबदार, उच्छृंखळ, पुरुषी व बदफैली बनतात" ( प्रस्तावना, 'मऱ्हाटी लावणी', १९५६/२००३).
ह्याचे खंडन मी त्या पोस्ट मध्ये केले होते.
आहिल्याबाई आणि आनंदीबाई यांच्यातील परस्पर व्यवहार हे आणखी एक उदाहरण आहे की स्त्रीया राजकारण करू लागल्यावर किती जबाबदारीने, परिपक्वतेने आणि संवेदनशीलतेने वागू शकतात याचे.
कृतज्ञता : दुर्गा भागवतांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.