Thursday, August 24, 2017

मानवतावादी,। उद्योगप्रवण, असे हे दर्शन। विंदांचे...Vinda Will Soon Be 100!

(खालील नोंदीत पूर्वी याच ब्लॉग वर प्रकाशित झालेला काही भाग आहे.)
 
#विंदाकरंदीकरशताब्दी 
#VindaKarandikarAt100
 
Today August 24 2017 is the start of the birth centenary year of Vinda Karandikar (विंदा करंदीकर) २३/८/१९१८-१४/३/२०१०

संत एकनाथ:

"जगाचिये नेत्री दिसे तो संसारी, परी तो अंतरी स्फटिक शुद्ध"

वसंत बापट, लोकसत्ता, २२//१९९३:

"...विंदाने अनुवाद केले ते वैश्विक मान्यता असलेल्या ग्रंथांचे.  अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव, गटेचे फाऊस्ट, शेक्सपियरचे किंग लियर.. एकेक आव्हान त्याने रामाने शिवधनुष्य पेलावे त्या सहजनेते पेलले. स्वतंत्र लेखनातही स्वतंत्र चमक दाखवली. भल्याभल्यांना स्तंभित करणाऱ्या कविता, प्रौढांनाही तोंडात बोटे घालायला लावणारी बालगीते, जे शब्दांच्या पलीकडले आहे त्याच्या स्पर्शाची पालवी फुटलेले ललित- लेखन, आकाशाचा अर्थ उजळ करणारे निबंध आणि परंपरा आणि नवता यांतले नाते आकलनाच्या टप्प्यात आणून ठेवणारी समीक्षा अशी साहित्याची चतुर्विध रूपे त्याने पुरुषार्थी वृत्तीने श्रीमंत करून टाकली...." 

The late Vinda was a good writer and a better human. He had large heart, one of the largest I have known, among literati.

He has appeared on this blog a few times.

As I have said earlier, he was like his own depiction of Cārvāka/ Charvak (चार्वाक), in possibly his best book: ‘Ashtadarshane’(अष्टदर्शने), 2003.

In Vinda's words, Charvaka was like: 

"...सत्याचा स्वीकार। श्रद्धांचा अव्हेर,
हिंसेचा धिक्कार, । करोनिया,
मानवी जीवन। करणे सुखमय
हेच एक ध्येय। मानणारे
मानवतावादी, । उद्योगप्रवण,
असे हे दर्शन । चार्वाकाचे."

In my words, Vinda was:

"सत्याचा स्वीकार। श्रद्धांचा अव्हेर,
हिंसेचा धिक्कार, । करोनिया,
मानवी जीवन। करणे सुखमय
हेच एक ध्येय। मानणारे
मानवतावादी, । उद्योगप्रवण,
असे हे दर्शन । विंदांचे."

अमर्त्य सेन आणि विंदा या दोघांचे , त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांतून व्यक्त झालेले , चार्वाक प्रेम दाखवून देणारे माझे पत्र 
सौजन्य : ललित मासिक , मे २००६



विंदांचे उत्तर  एप्रिलमध्येच कारण मी त्यांना ललित पत्राची प्रत पाठवली होती ! .... Vinda's letter to me dated April 26 2006