Sunday, October 29, 2017

...शेवटी शेवाळ आलं ओठांपर्यंत साठून / थडग्यांवरची नावं झाकून गेली...When A Quiet Passion Dies

एमिली डिकिन्सन (Emily Dickinson) १८३०-१८८६ या माझ्या आवडत्या कवी आहेत.  त्यांच्या कविता आणि काही प्रसिद्ध paintings असलेले खालील पॉकेट बुक साईझ चे पुस्तक मी २००२साली विकत घेतले आहे. 


त्यांच्या जीवनावरचा  'ए क्वायेट पॅशन' (A Quiet Passion), २०१६ नावाचा सुंदर सिनेमा ऑक्टोबर २०१७मध्ये पहिला.... सिंथिया निक्सन (Cynthia Nixon) यांचा अभिनय हलवून टाकणारा आहे.... 

डिकिन्सन यांनी एकूण १८०० कविता लिहिल्या. त्यातील जेमतेम फक्त एक डझन कविता त्यांच्या जिवंतपणी प्रकाशित झाल्या होत्या! 

मला एका गोष्टीची उत्सुकता आहे की महाराष्ट्रातील कवींना डिकिन्सन पहिल्यांदा केंव्हा वाचायला मिळाल्या? केशवसुत , बालकवी, गोविंदाग्रज, नाट्यछटाकार दिवाकर , माधव जूलियन इ. यांनी डिकिन्सन वाचल्या होत्या का? आणि असल्यास केंव्हा?

आनंदाची आणि थोडी आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री मधुकर नाईक यांनी डिकिन्सन यांच्या १५२कवितांचा अनुवाद १९९० साली मराठीत केला आहे: 'एमिली डिकिन्सन्: निवडक कविता : (विवेचक प्रस्तावना व टिपांसहित)'. 

या पुस्तकात ज्या लेखकांचा डिकिन्सन यांच्यावर प्रभाव होता त्यात एमिली ब्रोंटे (Emily Brontë) यांचे नाव येत नाही पण सिनेमात मात्र ब्रोंटे प्रामुख्याने उल्लेखल्या आहेत. 

नाईक लिहतात:


इलियट, ऑडेन, मर्ढेकर, सदानंद रेगे यांच्या मार्गे सुद्धा डिकिन्सन आपल्यापर्यंत पोचत असतात. रेगे आणि त्यांच्यात तर खूप साम्य वाटते : निसर्ग, प्रेम, (कदाचित) नसलेला देव, येशूचा अंत, मृत्यू...आणि ह्या शिवाय, अगदी रेगे छाप,... "Dickinson's poetry frequently uses humor, puns, irony and satire"...

खालील कविता मी त्यांची वाचलेली पहिली कविता ... अतिशय आवडलेली (त्यात भरपूर प्लेटो असून!).... विशेषतः moss had reached our lips, And covered up our names....ह्या ओळी....
 
"I died for beauty, but was scarce

Adjusted in the tomb,
When one who died for truth was lain
In an adjoining room.
He questioned softly why I failed?
“For beauty,” I replied.
“And I for truth,—the two are one;
We brethren are,” he said.
And so, as kinsmen met a night,
We talked between the rooms,
Until the moss had reached our lips,
And covered up our names."

 
वरील कवितेचा नाईक यांनी केलेला अनुवाद पहा:
 सौजन्य: श्री मधुकर नाईक
सौजन्य: कॉपी राईट धारक

2 comments:

  1. या मराठी पुस्तकाविषयी मला माहीत नव्हतं. ही पोस्ट बघून इंटरनेटवर शोधल्यावर कळलं की, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळानं हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यांच्या वेबसाइटवर आता (मंडळाच्या इतर अनेक जुन्या पुस्तकांप्रमाणे) या पुस्तकाची स्कॅन केलेली पीडीएफ प्रत उपलब्ध आहे, ती सापडली: https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Emili%20Dikinasans.pdf

    कविता सुंदर आहे. खासकरून शेवटची ओळ. असा भाषांतराचा प्रयत्न करणं, हेही सुंदरच आहे. त्याचं मूल्यमापन वेगळं करता येईल. इथं मला नाईक यांचा प्रयत्नही चांगला वाटला. थँक्स.

    -

    'अभिनय हलवून टाकणारा आहे' यातल्या 'हलवून'ऐवजी 'हेलावून' अधिक सहज वाटेल, असं वाटलं. 'मूव्हिंग' हाच अर्थ त्यातून अधिक सहज पोचेल कदाचित.

    ReplyDelete
  2. Thanks, I agree....It's a wonderful effort....I have the book from the same source....I am glad you got to it....I should have given it in the post itself

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.