Monday, September 25, 2017

कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!....वेणी घालताना पाहून...Manspreading is Ugly but Womanspreading?

#केशवसुतkeshavsut
(या पोस्टमधील काही मजकूर मी मेन्टेन करत असलेल्या दीनानाथ दलाल पेज वर येवून गेला आहे.)

 इंग्लिश विकिपीडिया मध्ये मॅनस्प्रेडींग (manspreading) या विषयावर पेज आहे.
Artist: Joe Dator, The New Yorker  (this cartoon has not been published in the print magazine.)


श्री. एस एस हवालदारांनीं बरीच चित्रे वाङ्मय शोभा साठी काढलेली दिसतात. मला त्यांचे खालील चित्र जास्त लक्षात राहिले,  एक दोन कारणांसाठी.

रंग: अशी रंगसंगती अलीकडे बघायला मिळत नाही ... रहस्यमय निळेपणा ...आणि निळा काळा रंग....बाबुराव अर्नाळकर et al यांच्या रहस्यकथांच्या मुखपृष्ठांवर असणारे ....

वेणी घालणे हा एकेकाळी मध्यमवर्गीय घरांतून फार मोठा कार्यक्रम असे. एकमेकींची वेणी घालणे. लहान मुलींची वेणी घालणे... आणि ती वेणी घालताना हा एवढा albatross सारखा झालेला स्त्रीचा wingspan... हे 'womanspreading' वरील कार्टून मधल्यासारख कुरूप नाही! हवालदारांनी तर ते  फार सुंदररीत्या पकडल आहे.

त्यातच तिची उंच मान पण दिसते.... बाहूंवर पसरलेल्या बांगड्या... नाकात चमकी... बाजूला नेकलेस ...
आणि आरसा समोर असून ती पाहतीय दुसरीकडेच... स्वप्नाळूपणे ...

मला स्वतःला वेणी घालताना बघणे हे काहीवेळा तरी खूप आकर्षक वाटायचे ...

केशवसुतांची  'रांगोळी घालताना पाहून' कविता प्रकाशित झाली १८९४ साली.  

अलिकडे एका मराठी वर्तमानपत्राच्या वेबसाईट वर केशवसुतांच्या या कवितेची दि. सिमस हिनींच्या 'Old Smoothing Iron'शी तुलना करणारा २०१३सालचा लेख पहिला. 

मला त्या कविता समांतर वाटत नाहीत. रांगोळी घालणारी कष्टकरी असेल, नसेल... आशावादी असेल, नसेल.. ती जे करतीय त्यात काबाडकष्ट नाहीयेत...कष्टांचा समाजवादी जयजयकार तर कवितेत बिलकुल नाहीये... "कष्टानंपण मन, शरीर हलकं होतं" अस केशवसुतांना निश्चित सांगायच नाहीय...ती एक कलाकृती निर्माण करतीय...तीला त्याची जाणीव कदाचित नाही म्हणून कवी आपल्याला बजावून सांगतोय:
"... साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!..."

[केशवसुतांनी दिवसेंदिवस खर्च करून काढलेली तिबेटी रांगोळी (sand mandala) घालताना पहिली नसेल. ती पहिली असती तर त्यांनी नक्कीच टोकाच्या सौन्दर्याच्या क्षणभंगुरतेबद्दल पण लिहले असते.]

१९व्या शतकात रांगोळी घालणाऱ्या स्त्रीला समांतर स्त्री आहे नट्टाफट्टा करणारी... साडी नेसणारी... सडा टाकणारी... निरांजन लावणारी... फुलांचा गजरा केसात माळण्यासाठी करणारी....झोक्यात बसलेली... गाणी म्हणणारी ... चातुर्मासात नाच करणारी... वेणी घालणारी...

केशवसुतांनी 'वेणी घालताना पाहून' कविता कशी लिहली नाही कुणास ठाऊक?

 
 सौजन्य : श्री. हवालदारांच्या चित्रांचे कॉपीराईट होल्डर्स, वाङ्मय शोभा, जुलै १९५७, बुकगंगा.कॉम

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.