W. H. Auden, 'Letter to Lord Byron', 1936: "...
You could not shock her more than she shocks me;
Beside her Joyce seems innocent as grass.
It makes me most uncomfortable to see
An English spinster of the middle-class
Describe the amorous effects of ‘brass’,
Reveal so frankly and with such sobriety
The economic basis of society
Beside her Joyce seems innocent as grass.
It makes me most uncomfortable to see
An English spinster of the middle-class
Describe the amorous effects of ‘brass’,
Reveal so frankly and with such sobriety
The economic basis of society
…"
Howard Jacobson: “Jane Austen's vision is a fraction from being a despairing
one, her final chapters are dispensations of kindness, like the fifth acts of
Shakespeare's comedies, in which we are spared bleakness by a hair's breadth,
though we feel its presence all around. George Eliot's best novels simmer with
a sometimes murderous frustration, no matter that her thwarted heroines can
finally be said to make things a little less "ill for you and me than they
might have been". If such dying falls allow us to sink for a while into a
contemplative wistfulness, our nerves go on feeling frayed long after. No good
writer ever merely cheered us up. But there's an unblinking stare into the
darkness of things we have to go elsewhere to find. Jane Austen was made of
strong stuff.”Brooke Allen: “For no filmed version of an Austen novel is really satisfactory: Of all 19th-century novelists, she dwells the least on the physical surfaces that are the essence of the cinematic art.”
[ही पोस्ट ह्या विषयाची सुरवात समजावी. ह्यात जेन ऑस्टेन यांच्यावर focus आहे.
Disclaimer: माझे या लेखकांविषयीच ज्ञान हे इंग्लिश सिनेमा, टीव्ही सिरियल्स आणि डॉक्युमेंटरी तसेच त्यांच्या वर लिहलेली पुस्तके आणि लेख यांवर जास्त आधारित आहे. त्यांच्या पुस्तकांचे वाचन मी चाळत केल आहे.]
सध्या १९व्या शतकातील तीन इंग्लिश स्त्रीलेखिका प्रचंड लोकप्रिय आणि टीकाकार-प्रिय झालेल्या आहेत.
जेन ऑस्टेन Jane Austen (१७७५-१८१७) , जॉर्ज इलियट George Eliot (१८१९-१८८०), शार्लट ब्रॉन्टी Charlotte Brontë (१८१६-१८५५). त्या तिघींचे एकही पुस्तक पहिल्यांदा छापल्या नंतर अजून आऊट ऑफ प्रिंट झाल नाहीय. (दुर्गा भागवतांची अनेक पुस्तके कित्येक वर्षे आऊट-ऑफ-प्रिंट होऊन परत आलीयत. मी स्वतः पॉप्युलर प्रकाशनाशी 'ऋतुचक्र', १९५६ पुन्हा छापण्याबद्दल पत्र/ई-मेल व्यवहार केला होता. माझी याविषयावरची पूर्वीची पोस्ट इथे वाचा.)
जेन ऑस्टेन तर १०पौंडाच्या नोटेवर पण विराजमान झाल्यात. इलियट यांची 'मिडलमार्च' नेहमी जगातील सर्वोत्तम कादंबऱ्यात समाविष्ट केली जाती. ब्रॉन्टी यांच्या कादंबऱ्या classics मानल्या जातात. ऑरवेल म्हणतात त्याप्रमाणे शेकडो वर्षे टिकून राहिलेली लोकप्रियता हा शेवटी महानतेचा सर्वात महत्वाचा निकष असतो. त्यांच्या मृत्यनंतर आज शेकडो वर्षे मराठी संतकवी लोकप्रिय आहेत आणि हे त्यांच्या महानतेचे प्रमुख लक्षण आहे.
ऑस्टेन यांची २००वी पुण्यतिथी नुकतीच पार पडली, ब्रॉन्टी यांची व्दिजन्मशताब्दी मागच्या वर्षी झाली आणि इलियट यांची व्दिजन्मशताब्दी अजून दोन वर्षानंतर आहे.
त्या तिघींच्या कोणत्या पुस्तकांचे अनुवाद मराठीत झाले आहेत याची, ऑस्टेन सोडल तर, मला कल्पना नाही.
ऑस्टेन यांच्या 'Pride and Prejudice', १८१३ च्या मराठीत १९१३मध्ये झालेल्या अनुवादाबद्दल - 'Aajpasoon Pannas Varshannee !' ("आजपासून पन्नास वर्षांनी !") by Krushnaji Keshav Gokhale (कृष्णाजी केशव गोखले)- मी इथे ऑक्टोबर २०१३ ला लिहले होते.
प्रो. वामनराव जोशी म्हणाले होते: "ज्याने समाजाचे कल्याण होत नाही, जे नीतीला पोषक नाही असे सत्यच आम्हाला नको." साधारणपणे गोपाळ गणेश आगरकरांच्या नंतर महाराष्ट्रात बोकाळलेल्या उपयुक्ततावादानुसार (utilitarianism) श्री. गोखले सुद्धा त्या कादंबरीची उपयुक्तता शोधतात आणि त्यानुसार तिचे नाव सुद्धा बदलतात! नाहीतर काय संबंध आहे 'Pride and Prejudice' चा 'Fifty Years From Now!' शी?
हे सगळ समजल्यावर ऑस्टेन यांनी हसून कपाळावर हात मारला असता. ऑस्टेन यांनी पुस्तके लोकांच्या मनोरंजनासाठी लिहली. आणि सभोवताली जे दिसल त्याबद्दल अत्यंत प्रामाणिकपणे, sincerely आणि विनोदी अंगाने आयुष्याकडे पहात लिहल.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्यांच्या ह ना आपटे यांच्या 'पण लक्षात कोण घेतो?", १८९० कादंबरीच्या परीक्षणात अस लिहल होत: "रा. आपट्यांनी स्त्रियांच्या दुःखाची कहाणी सांगितली आहे तशी मागासलेल्या जातीच्या दुःखाची सांगितल्यास ती मिसेस स्टौच्या 'टॉम काकाची कोठडी' या कादंबरीच्या खालोखाल क्रांतिकारक होईल अशी खात्री वाटते. "
मला हा सल्ला एकेकाळी खूप 'स्मार्ट' वाटला होता पण तो मला आता तसा वाटत नाही कारण कोल्हटकरांनी हा सल्ला कदाचित ऑस्टेन यांना पण दिला असता कारण ऑस्टेन इंग्लंड मधील 'working class' बद्दल त्यांच्या लेखनात लिहीत नव्हत्या. माझ्या मते कादंबरी कोणाबद्दल लिहली आहे हे कमी महत्वाचे असून ती कोणत्या दर्जाची आहे हे महत्वाचे आहे. सुख, दुःख कोणाचीही असोत ती किती प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोचतात त्यावर लेखनाचा दर्जा ठरतो. (मराठी भाषेत मात्र गेली कित्येक दशके कथा-कादंबरी-कविता-सिनेस्क्रीप्ट कोणाबद्दल लिहली आहे आणि लिहणाऱ्याची विचारधारा काय हे जास्त महत्वाचे मानले जाते. )
वि का राजवाडे यांच्या मते महान कादंबरी : "लहान मुलांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात युक्ति व साहस ह्यांचे बीजारोपण करील ;स्त्रीजनांना संसारसुखाची गुरुकिल्ली पटवील; तरुणांना राष्ट्रीय महत्वाकांक्षेचे रहस्य कळवील; आणि वृद्धांना आयुष्याच्या इतिकर्तव्यतेचे दिग्दर्शन करील; आणि इतकेहि करून ते कसे व केंव्हां केले हें कोणाला समजून देणार नाही. अशी ह्या मयासुराची करणी आहे. युधिष्ठिराप्रमाणे ती ज्या लोकांना लाभली ते लोक धन्य होत!"
(left) 'Mansfield Park', Artist: Not known to me
'Pride and Prejudice' (right)
Artist: Not known to me
जे दिलीप पुरुषोत्तम चित्रे २०व्या शतकातील कुठल्याच मराठी ललित लेखकाला महान म्हणत नाहीत, ते ऑस्टेन यांच्याबद्दल म्हणतात: "...मराठ्यांचा पाडाव होऊन ईस्ट इंडिया कंपनीचा प्रभाव भारतभर पसरण्यापूर्वीच जेन ऑस्टेनसारखी महान स्त्री कादंबरीकार इंग्लंडमध्ये होऊन गेली होती..."
('पुन्हा तुकाराम
', पॉप्युलर प्रकाशन, १९९०/१९९५)
मी वाचत असलेल्या या मराठी समीक्षकांनी ऑस्टेन यांना दुर्लक्षिले याबद्दल जास्त आश्चर्य वाटते हे खालील वाचून:
"...It is the subcontinent, however, that has embraced her books most enthusiastically, with Austen societies established in both India and Pakistan. The Pakistani group hosts inventively named sessions for “Jovial Janeites” such as “Austentatious tea parties” and “chai and chatter”. Big-screen adaptations have fused Regency drama with Bollywood verve. “Bride and Prejudice” (2004), set in Amritsar, substituted Lalita Bakshi for Elizabeth Bennet and Indian weddings for country dances. “Kandukondain Kandukondain” (2000), a Tamil romance film, and “Kumkum Bhagya” (2014), an Indian soap opera, are both based on “Sense and Sensibility”; “Aisha” (2010) is an adaptation of “Emma” set amid Delhi’s upper class.
The economic and social position of women, their reputation and eligibility are all themes that are easy to adapt to different cultural contexts, but there are specifics that resonate in Indian and Pakistani society, too, such as the importance of familial bonds, the preference given to male inheritance, the dowry system and the “marrying off” of young women by overzealous mothers and aunts..."
(The Economist, July 13 2017)
मी अलीकडेच 'Pride and Prejudice', २००५ पहिला आणि तो पहात असताना मी माझ्या बालपणी (१९६०-१९८१) मिरजेत पाहिलेल्या, स्त्रियांना मिळत असलेल्या वागणूकीची, भले 'Ball (dance)' होत नसतील, आठवण होत राहिली.
कलावंत : वसंत सरवटे
मुलीचे लग्न जुळवण्याची धडपड तर सतत पहायचो पण अगदी P&P मधल्या dialogue सारखे अनेक 'spinster in the making' सुद्धा मी पहिल्या आहेत. माझ्या बरोबरच्या 'बऱ्या' दिसणाऱ्या जवळजवळ सर्व मुलींची लग्ने त्या २०-२१वर्षाच्या असताना किंवा त्याच्या आतच जुळवली गेली. १०वी झाल्यानंतर त्यांचे लग्न केंव्हाही ठरू शके. मी ग्रॅजुएट होईपर्यंत त्यातला अनेक जणी आई झाल्या होत्या किंवा होणार होत्या. ही सगळी धांदल बघून मला त्याही काळात आश्चर्य वाटल्याच आठवतय: काय घाई होती मुलींची लग्न इतक्या लवकर लावून द्यायची?
आज बऱ्याच गोष्टी बदलल्या सारख्या वाटतात पण खरच किती बदलल्यात हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्राच स्त्री / पुरुष प्रमाण, जे सध्या ९२५ आहे, भारताच्या प्रमाणापेक्षा, ९४०, ते खाली गेलेय. हे कदाचित माझ्या जन्मानंतर पहिल्यांदा झालय. आंतरजातीय विवाहाचे प्रमाण नगण्य आहे. हुंडापद्धत कमी झाली असेल पण विवाह बऱ्याच वेळा वधूपिता 'थाटामाटात' लावून देतात.
स्त्रियांचे आर्थिक पारतंत्र्य , जे शतकानुशतके चालू आहे, अजून कायम आहे. माझ्यामते जो पर्यंत स्त्रीया पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत, त्यांच्या नावावर ५०% financial assets होत नाहीत, तो पर्यंत त्या sub-optimal असेच निर्णय स्वतःच्या सुखाबाबत घेत राहणार, त्यांची प्रतिभा पूर्णपणे फुलणार नाही.
हे सगळ कमी जास्त प्रमाणात ऑस्टेन-बाईंच्या लेखनात येत मग माझ्या लहानपणच्या समाजात त्या (किंवा त्यांची रुपांतरे) माझ्या सारख्या वाचकाच्या, श्रोत्याच्या पुढ सारख्या का यायच्या नाहीत? त्यांना वाचून, रंगमंचावर-सिनेमात पाहून मराठी स्त्रीयांना कदाचित थोड बर वाटल असत. किमान पुरुषांना पोटभर हसल्यातरी असत्या त्या... लिझी बेनेट सारख्या.
Keira Knightley as Elizabeth Benett in 'Pride and Prejudice',2005
सौजन्य : HBO
सौजन्य : HBO
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.