Monday, January 30, 2017

गोडसेंचा गोंधळ : कुठाय चांदण्यातील मखमली नीलिमा?...James Abbott McNeill Whistler's Two Nocturnes

कै द ग गोडसेंनी जेम्स अॅबट मॅकनील व्हिस्टलर (James Abbott McNeill Whistler) १८३४-१९०३ वरती दोन अप्रतिम लेख लिहले आहेत. ते त्यांच्या 'नांगी असलेले फुलपाखरू', १९८९ पुस्तकाच्या सुरवातीलाच छापले आहेत.

गोडसे व्हिस्टलरांच्या व्यक्तिमत्वावर व कलेवर फार खुष  होते, हे आपल्याला पदोपदी जाणवते. पुस्तकाचे शीर्षकच म्हणजे व्हिस्टलरांचे बोध चिन्ह आहे. नांगी असलेले फुलपाखरू= a stylized butterfly possessing a long stinger for a tail.

गोडशांचे मस्तानी प्रेम आणि व्हिस्टलर प्रेम या अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याला अनेक आंग, अगदी फ्रॉइडीअन (Freudian) सुद्धा, आहेत असे मला वाटते.

एका ठिकाणी (पृष्ठ ४०) गोडसे व्हिस्टलर लेखात लिहतात :


या अतिशय हृदय वर्णनात मात्र गोडसेंचा  गोंधळ उडाला आहे! त्यांनी त्यांच्या मनपटलावर व्हिस्टलरची दोन चित्रे एकत्र केली आहेत.

वरील वर्णन बऱ्याच प्रमाणात खालील चित्राला लागू आहे.


'Nocturne in Blue and Gold: Old Battersea Bridge'

सौजन्य : विकिमीडिया कॉमनस 

या चित्राचे नाव आहे 'नॉक्टर्न इन ब्लू अँड गोल्ड: जुना बॅटरसी ब्रिज'. मात्र या चित्रात मला तरी 'चांदण्यातील मखमली नीलिमा' कुठं दिसत नाहीय आणि ... आणि नसणारच कारण 'नॉक्टर्न इन ब्लू अँड सिल्वर...अथवा बॅटरसी ब्रिज' हे समीकरणच चुकीचे आहे. बरोबर समीकरण आहेत 'नॉक्टर्न इन ब्लू अँड गोल्ड... अथवा जुना बॅटरसी ब्रिज' आणि 'नॉक्टर्न इन ब्लू अँड सिल्वर...अथवा चेल्सी'!

'चेल्सी' चित्र खाली आहे. यात दिसतो 'चांदण्यातील मखमली नीलिमा'



Nocturne- Blue and Silver - Chelsea

 सौजन्य : विकिपीडिया

म्हणजे मग कोणते चित्र कोर्टरूम मध्ये १८७८ साली आणले गेले होते? इंटरनेटवर वाचून मला खात्री आहे: 'जुना बॅटरसी ब्रिज' चित्र पण  मला आश्चर्य वाटते या चुकीबद्दल. छापायला दिलेल्या माहितीची यथार्थता पाहणे हे काम कोणाचे? लेखकाचे की संपादकाचे? या चुकीने गोडशांची सांस्कृतिक महत्ता किंचितही कमी होत नाही पण अशा चुका याच किंवा त्यांच्या इतर पुस्तकात असतील का? असतील तर त्याने रसभंग होतो का?

मराठी ललित (nonfiction) लेखनांमधून अशा बऱ्याच चुका (factual errors) सापडत असतात. ३ एप्रिल २०१६ ची त्यावरील एक नोंद (When There Were No Wikipedia and Google...and Now That They Are Here...) पहा.

1 comment:

  1. ढिसाळणा फार आढळून येतो...सारंग म्हणतात तशी 'रा भा पाटणकरी' शिस्त नाही...आणि सगळ्यात शेवटी समूह वास्तववाद काढायाचा...

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.