कै. मुळगावकरांच्या कलेच्या दर्जाबद्दल मतभिन्नता आहे पण मी मात्र लहानपणापासून त्यांच्या चित्रांकडे - कॅलेंडर वरच्या, जाहिरातीतल्या, मुखपृष्ठा वरच्या- आकर्षित झालो आहे. बाबूराव अर्नाळकरांची मी जास्त पुस्तके वाचली नाहीयेत पण मुळगावकर-कृत त्यांची मुखपृष्ठे मात्र कायम लक्षात राहिली आहेत.
मुळगावकरांनी वाङ्मय-शोभा मासिकासाठी एकाहून एक आकर्षक चित्रे काढली आहेत. कै. दीनानाथ दलाल आणि त्यांची एकप्रकारे जणू स्पर्धाच वाङ्मय-शोभेच्या मुखपृष्ठ-आखाड्यात चालू होती!
वरील जाहिरात वाङ्मय-शोभेच्या नोव्हेंबर १९५१च्या मलपृष्ठावर आहे.
अभिनेत्री उषा किरण (१९२९-२०००) ह्या त्या काळाला अनुरूप अशा सुद्रुढ सुंदर होत्या, आत्तासारख्या अनोरेक्सिक सुंदर नव्हत्या.
त्यावर आधारित मासिकाचे मुखपृष्ठ मुळगावकरांनी किती सुंदर बनवले ते खाली पहा. (मुळगावकर यांची नाममुद्रा या चित्राच्या खाली कोठेही दिसत नाहीये पण मी तो अंदाज बांधला आहे वाङ्मय-शोभेची त्यावर्षातील त्यांची इतर मुखपृष्ठ चित्रे पाहून. माझी चूक झाली असल्यास मी ह्या चित्राच्या खऱ्या चित्रकाराची माफी मागतो.)
ती मुखपृष्ठ तारका उषा किरण यांच्या सारखी हुबेहूब दिसत नसेल पण कोण करेल तक्रार तीचे शालीन पण उठावदार सौन्दर्य बघून?
courtesy: copyright owners of the late Raghuvir Mulgaonkar's (or the artist's) work and Vangmay Shobha
आता त्याच वर्षाचे एप्रिल मधील मुखपृष्ठ पहा...हे ही (मला ओळखू येत नसलेल्या) तारकेवरच आधारित आहे... यावर सुद्धा मुळगावकर यांची नाममुद्रा या चित्राच्या खाली कोठेही दिसत नाहीये पण ते बहुदा त्यांचेच आहे.
courtesy: copyright owners of the late Raghuvir Mulgaonkar's (or the artist's) work and Vangmay Shobha
कै. रघुवीर मुळगावकर यांच्या उद्याच्या १४ डिसेंबर २०१६च्या ९८व्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण सादर केलेली त्यांची वाङ्मयशोभा मासिकावरची मुखपृष्ठे पाहून त्या जुन्या चित्रांची आठवण जागी झाली. आपल्याकडे या नयनमनोहर चित्रांचा असलेला हा ठेवा आपण आमच्यासाठी उघड करत आहात आणि त्याबरोबर मराठीतून लिहिता याचा मला अधिक आनंद होतो. कारण यापूर्वी आपण अनेकदा मराठी लेखकांच्या साहित्यावर इंग्रजीतून लिहीत होता आणि मला ते खटकत असे. असो, आपण केलेला हा बदल कौतुकास्पद आहे. वसंत सरवटे, दीनानाथ दलाल, शि. द. फडणीस आणि रघुवीर मुळगावकर यांचे असेच गुणगान आपल्या अनुदिनीमधून वाचायला मिळत राहो.
ReplyDeleteमंगेश नाबर
Thanks a lot Mangesh...Your words have always encouraged me...thanks again,
ReplyDeleteThis post reminds me of a unique collection of my father in law Shri Daa Khadilkar who would been 100 years of age in July 2016; he passed away in Feb 2015 in Pune. He was commercial artist of J J School first batch of 1943. An avid reader of English magazines like Saturday Evening post he found plagiarism of covers/advertisements copied on the covers of Kirloskar and Stree etc. by artists like Mali. I have his collection of some 30 original and the copies in Indian garb that makes a very entertaining viewing. I can share them with your blog for the readers.
ReplyDeleteThanks for this information. I will let you know. So far my objective has been just to appreciate the beauty and not detect the plagiarism etc. I know so much in Marathi was really plagiarized, and not just covers! best,
ReplyDeleteतुमच्याकडे मूगावकरांचे चित्र असतील तर कृपया मला 9699661956 whats app no वर पाठवा
ReplyDelete