Wednesday, August 03, 2016

पहिले महायुद्ध आणि मराठी साहित्य...World War I and Marathi Literature




Jay Winter, Introduction to ‘The Great War and Modern Memory’, 1975 by Paul Fussell:

“…When he published The Great War and Modern Memory in 1975, he set in motion what is now an avalanche of books and articles of all kinds on the First World War. He did much to create the field in which I have worked for the last four decades.

How did he do it? By using his emotion and his anger to frame his understanding of memory, and his insight into the way language frames memory, especially memories of war. War, he knew, is simply too frightful, too chaotic, too arbitrary, too bizarre, too uncanny a set of events and images to grasp directly. We need blinkers, spectacles, shades to glimpse war even indirectly. Without filters, we are blinded by its searing light. Language is such a filter. So is painting; photography; film. The indelible imprint Paul Fussell left on our understanding of war was on how language frames what he termed “modern memory.”

The term is seductively simple but essentially subtle and nuanced. Fussell meant that through writing about war, First World War veterans left us a narrative framework we frequently overlook. Drawing on the literary scholarship of the Canadian critic Northrop Fry, he made these distinctions. Instead of viewing war as epic, the way Homer did, where the freedom of action of the hero, Achilles, was greater than our own, and instead of viewing war as realistic, as Stendhal did in The Charterhouse of Parma or Tolstoy did in War and Peace, with Fabrizio or Pierre exercising the same confusion and freedom of action we, the readers have, Great War writers did something else. They told us of the ironic nature of war, how it is always worse than we think it will be, and how it traps the soldier—no longer the hero—in a field of force of overwhelming violence, a place where his freedom of action is less than ours, where death is arbitrary and everywhere. What had happened in 1914–18, Fussell argued, happened again in later wars, whose narrators built on the painful achievement of the soldier writers of the Great War. Men like Owen, Sassoon, Rosenberg, Gurney were thus sentinels, standing in a long line of men in uniform who were victims of war just as surely as the men they killed and the men who died by their side…”

दुर्गा भागवत:

"...आणि व्यासाचे उच्छिष्ट खाणारे आम्ही? व्यासाची प्रज्ञा तर घालवून बसलोच, पण आमची प्रतिभाही आटलीमानवी अंतरंग असो किंवा बाह्य सृष्टी असो, प्रकृतीचे आकलन, तेही सूक्ष्म असल्याशिवाय, कल्पना उंचावत नाहीत, भावना संयत होत नाहीत. विभूषित होत नाहीत. आणि म्हणूनच फुलपाखरांचा अभाव हा भारतीय साहित्याच्या अनेक अभांवाचा प्रातिनिधिक अभाव आहे असे मला वाटते "

विलास सारंग:
 "...१९२० नंतर मराठी बहुजन व दलित समूह  जागृत झाले. त्यांनी लढाऊ हालचालींना प्रारंभ केला..."
(पृष्ठ: ९१-९२, 'वाङ्मयीन संस्कृतीव सामाजिक वास्तव', २०११)

Alexander Watson:

”...The First World War has long been recognized as the twentieth century’s ‘great seminal catastrophe’. Seventy million men were mobilized to fight over the four years and four months that it raged. Nearly ten million people were killed. Communities were destroyed, populations displaced...”
 (‘Ring of Steel: Germany and Austria-Hungary in World War I’, 2014)

साधारण शंभर वर्षांपूर्वी जुलै १९१६, पहिल्या महायुद्धातील सोमच्या (Somme) लढाईला सुरवात झाली. ही लढाई म्हणजे मानवी इतिहासातील एक काळकुट्ट प्रकरण आहे.

ही लढाई  मराठी बोलणाऱ्या माणसांना कदाचित वाटते त्यापेक्षा फार जवळची आहे कारण त्यात कित्येक मराठी माणसांनी जीव गमावला आहे. [१२ लाख भारतीय जवानांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला आणि त्यातील ७४,००० जणांनी प्राणांची आहुती दिली. दुसऱ्या महायुद्धात ८७,००० वारले; १९७१च्या युद्धात ,९००; १९६२च्या ,०००; १९६५च्या ,३०० जवान शहीद झाले होते. हे सर्व आकडे विकिपेडिया वर आधारित.]

...आणि मराठी मध्ये ह्या सगळ्याची नोंद करणार- 'ऑल क्वायेट ऑन धी वेस्टर्न फ्रंट', १९२९ सारखी कादंबरी तर सोडाच- एकही नावाजलेले पुस्तक त्याकाळात लिहल गेल नाही! ना लिहली गेली एखादी ओवेन वा ससून सारखी अजरामर कविता.

माझ्या मते ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी या युद्धातील ऍक्शन मधे जवळ जवळ भाग घेतला नाही आणि महाराष्ट्रातील बहुजन समाज त्यावेळी ललित साहित्यात मोठ्या प्रमाणात उतरला नव्हता.
या युद्धातील एक हृद्य घटना अशी.

'कटचा वेढा' (Siege of Kut) १९१५-१६ मध्ये कितीतरी मराठी भाषिक सैनिक अडकले होते. प्रचंड उपासमार सुरू झाली होती. घोड्याचे मास खाणे हा एकमेव उपाय उरला होता. मराठी सैनिकांनी धर्मभ्रष्ट होऊ म्हणून खायला नकार दिला. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी शाहू महाराजांना (१८७४-१९२२) विचारल की ते मास खाल्ल तर चालेल का. महाराजांनी त्यांना परवांनगी तर दिलीच पण अतिशय हेलावून टाकणारे पत्र लिहल. ते वाचूनच, मला खात्री आहे, मराठी सैनिकांच्या अंगावर मूठभर मास चढल असेल!

सौजन्य : "राजश्री श्रीशाहूमहाराजांची भाषणे", पृष्ठ १७७-१८०, लोकवाङ्मय गृह, २००९

आता प्रश्न असा पडतो की कुणा ब्राह्मणाने बहुजनांची ही कुर्बानी बघून त्यावर का एखादी कादंबरी लिहली नाही? का महान बालकवींना (१८९०-१९१८) हे पलीकडल्या गल्लीतले, परक्याची लढाई लढताना आलेले वैधव्याचे दुःख दिसल नाही? का एखादा गोडसे भटजी सोमच्या जवळपास फिरत नव्हता? का एखादा बखरकार किमान ऐकलेल्या गोष्टींवर कहाण्या रचत नव्हता? का एखादी तरल नाट्यछटा अशा उपऱ्या प्रदेशात आलेल्या मृत्यूवर लिहली गेली नाही? १८व्या शतकातील 'दुर्दैवी रंगू(१९१४, लेखक:चिंतामण विनायक वैद्य) अजून दिसत होती मग वर्तमानातील अभागी गंगू कुठे लपली होती? (पानिपत,१७६१ बद्दल मराठी लोक अजुनही किती भावविवश होतात.)

नकळत पणे (बा.सी.) मर्ढेकर (१९०९-१९५६) यात ओढले गेले ते असे. त्यांच्या कवितेची एक ओळ
"पावसाळे आले गेले; दोन युद्धे जमा झाली;"

कै दि के बेडेकरांनी चांगल फटकारल!
"...'दोन युद्धे जमा झाली' या चार शब्दांत कोट्यावधी भारतीयांच्या, नव्हे सर्व मानवजातीच्याच वेदनांचे मृत्यूचे ब्रह्मांड सामावलेले आहे. पण मर्ढेकर परमहंसगतीला पोहोचलेले असल्यासारखे आहेत ! त्यांच्या कालप्रवाहाला मनुष्यांच्या सुखदुःखांचे मोजमाप लागत नाही. नुसते पावसाळे येतात नि जातात हीच कालगणना !..."
 ('साहित्य : निर्मिती समीक्षा', १९५४)

आता थोडी कल्पना करू की मराठीमधे जर पहिल्या महायुद्धावर उत्तम साहित्य निर्मिती झाली असती तर त्याचे परिणाम दूरगामी असू शकते.

(कृपया हे लक्षात घ्यावे की मी तत्कालीन कथा, कादंबऱ्या, नाटक आणि कवितांबद्दल बोलत आहे...तत्कालीन म्हणजे ज्या दुसऱ्या महायुध्दाच्या सुरुवातीपर्यंत, १९३९, लिहल्या गेल्या...तसे पहिल्या महायुद्धाचे उल्लेख तत्कालीन छापील मराठीत पुष्कळ सापडतात.) 

2 comments:

  1. आपल्या अनुदिनीमध्ये आज आलेल्या मराठी लेखाबद्दल आनंद व्यक्त करतो. आपण आजवर जे लिहीत आला आहात ते मराठी साहित्य व साहित्यिकांवर असून ते इंग्रजीत असते याचे मला आश्चर्य वाटत आले आहे.
    मंगेश नाबर

    ReplyDelete
  2. Thanks Mr. Mangesh...I know your feelings...Thanks again

    ReplyDelete

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.