लोकसत्ता, June 17 2015:
"'सदन'भुजबळ!: छापासत्रात डोळे दिपविणारी मालमत्ता समोर:
महात्मा फुले यांचे नाव घेत सामाजिक समतेचा लढा देणारे 'समाजसेवक', राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्धच्या चौकशीची चक्रे मंगळवारी अधिक वेगाने फिरू लागली. भुजबळ आणि कुटुंबियांच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, लोणावळा येथील विविध मालमत्तांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती सुरू केली आणि एकेकाळी फूल बाजारात फुले विकणाऱ्या भुजबळ यांच्या कुटुंबाची राजकारणात शिरल्यानंतरची आश्चर्यचकित करणारी भरभराट महाराष्ट्रासमोर अधिकृतपणे उघड झाली. मंगळवारी दिवसभर चाललेल्या या छाप्यांनंतर भुजबळ यांच्या मालमत्तेचा तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच उघड केला. आलिशान महाल, बंगले, इमारती, सदनिका, विस्तीर्ण भूखंड, ऐतिहासिक मोलाच्या प्राचीन वस्तू असा डोळे दिपविणारा खजिना या तपासात उघड झाला..."
लोकसत्ता, June 18 2015:
"...तूर्त तात्पर्य हे की एका भुजबळांवर कारवाई झाली म्हणून इतके सारे बाहेर आले. पण म्हणून ते एकमेव असे आहेत वा होते असे नाही. त्यांच्यावर कारवाई करणे हे सर्वासाठीच सोयीचे असल्याने ती होत आहे. यावरून, आता अशी कारवाई सर्वावरच होईल इतका आशावाद बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. तशी ती होणे गरजेचे आहे, हे मान्य. पण तसे होत नाही तोपर्यंत भुजबळांच्या जमीनजुमल्याकडे आणि संपत्तीकडे पाहात छगन सदन तेजोमय..असेच म्हणत बसावे लागेल."
लोकसत्ता, June 19 2015:
"...या सरकारकडून कधी जेलमध्ये टाकले जाते याची आम्हीही वाट पाहात आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली..."
Apart from a million other defense mechanisms available to some one like Mr. Bhujbal in India's democracy- 'heart attack' to 'he is not me' (तो मी नव्हेच)- here is one more:
Artist: Paul Noth, The New Yorker, June 2015
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.