Artist: Unknown to me
courtesy: FB page of Dangerous Minds
Launched on Nov 29 2006, now 2,100+ posts...This bilingual blog - 'आन्याची फाटकी पासोडी' in Marathi- is largely a celebration of visual and/or comic ...तुकाराम: "ढेकणासी बाज गड,उतरचढ केवढी"...George Santayana: " Everything in nature is lyrical in its ideal essence, tragic in its fate, and comic in its existence"...William Hazlitt: "Pictures are scattered like stray gifts through the world; and while they remain, earth has yet a little gilding."
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.
६ मे १९५०
ReplyDeleteपरवा झोप येईना म्हणून मी आरामखुर्ची बाहेर टाकून एकटाच पडलो होतो. आकाश स्वच्छ होते. निळ्या-काळ्या आकाशातील तारे धुतल्यासारखे स्वच्छ होते. सर्वत्र शांत होते. मी आकाशात पाहत होतो. ताऱ्यांचे मुके सकंप संगीत अनुभवत होतो. वेदामध्ये वरूण ही नीतीची देवता आहे. वरूण म्हणजे आच्छादन घालणारा. हा आकाशाचा देव पुढे समुद्राचा कसा झाला कोणास कळे. वेदांत वरूण ही नीतीची देवता आहे. ताऱ्याच्या हजारो डोळ्यांनी तो तुमचेकडे बघत आहे असे वर्णन येते. मला त्या वर्णनाची परवा आठवण झाली. जणू विराट् विश्वंभर बघत आहे असे वाटले. ते सहस्त्र डोळे माझ्या जीवनात घुसत आहेत असे वाटले. मी घाबरलो. आपले सारे जीवन कोणी बघावे असे आपणास वाटत नाही. जीवनात नाना खळमळ असतात. दडून राहिलेल्या शेकडो गोष्टी. वरून रंगीत दिसणारे कृत्रिम फळ आत मातीचे वा शेणाचे असते. मी डोळे मिटले आणि उठून घरात आलो. केव्हा झोप लागली कळलेही नाही. उठलो तो मन शांत होते. झोप म्हणजे जणू अमृत, नवजीवनदायी अमृतांजन! विश्वमातेचा प्रेमळ हात! झोपेचा केवढा उपकार! परंतु झोप म्हणजे लहानसे मरण. मोठी झोप म्हणजे मोठे मरण! म्हणून मरणाचेही उपकार! मरणही सुंदर, जीवनही सुंदर! गंमत.
- साने गुरुजी (स्वप्न आणि सत्य).
Beautiful...thanks...
ReplyDeletewhen I started reading, I could not guess the author...not surprised to see Sane-guruji's name at the end...he could be so modern...