Sunday, June 14, 2026

जशि धोब्याची मऊ इस्तरी कशी बदलली ....B S Mardhekar in Deepawali Magazine of 1949 and Book

 "जशि धोब्याची मऊ इस्तरी 

तलम  फिरावी सुतावरूनी,

फाल्गुनांतील चंद्रकोर तशि 

मलिन मनांच्या धाग्यांवरूनी. 

        शिणेल धोबी यदाकदाचित् ,

        पडेल खाली चंद्रकोर अन् ,

        सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना  

        पुनश्च कोठें भट्टी भगवन् !"

(पृष्ठ ९१, मर्ढेकरांची कविता , १९५९-१९७७)   

ही कविता दीपावली अंकाच्या १९४९ सालच्या दिवाळी अंकात बहुदा दीनानाथ दलालांच्या चित्रासकट पण १५५ वर अशी आली होती:


 पुस्तकातील आणि मासिकातील कवितेत बऱ्यापैकी फरक आहेत, विशेषतः विराम चिन्हात . मासिकातील अर्धविराम नाहीसा झाला आहे आणि स्वल्पविराम व पूर्णविराम आले आहेत ... 

उपसंपादकाच्या डुलक्या का काय माहित नाही, पण  भट्टी भगवन् या दोन शब्दांमध्ये मध्ये पुस्तकात विरामचिन्ह नाही. 

मासिकाची अनुक्रमणिका : 


 

 काही वर्षात मर्ढेकरांचे नाव पहिले, पहिले आले असते ....