"जशि धोब्याची मऊ इस्तरी
तलम फिरावी सुतावरूनी,
फाल्गुनांतील चंद्रकोर तशि
मलिन मनांच्या धाग्यांवरूनी.
शिणेल धोबी यदाकदाचित् ,
पडेल खाली चंद्रकोर अन् ,
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना
पुनश्च कोठें भट्टी भगवन् !"
(पृष्ठ ९१, मर्ढेकरांची कविता , १९५९-१९७७)
ही कविता दीपावली अंकाच्या १९४९ सालच्या दिवाळी अंकात बहुदा दीनानाथ दलालांच्या चित्रासकट पण १५५ वर अशी आली होती:
पुस्तकातील आणि मासिकातील कवितेत बऱ्यापैकी फरक आहेत, विशेषतः विराम चिन्हात . मासिकातील अर्धविराम नाहीसा झाला आहे आणि स्वल्पविराम व पूर्णविराम आले आहेत ...
उपसंपादकाच्या डुलक्या का काय माहित नाही, पण भट्टी भगवन् या दोन शब्दांमध्ये मध्ये पुस्तकात विरामचिन्ह नाही.
मासिकाची अनुक्रमणिका :
काही वर्षात मर्ढेकरांचे नाव पहिले, पहिले आले असते ....


No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.