"...In conclusion, to assess the contribution made by cyclist units, one only needs to look among the graves in the British Commonwealth War Grave Commission cemeteries from the First World War to see the headstones of the men who served with units such as the British Army Cyclist Corps, or the names on the memorials to those with no-known-grave such as Tyne Cot in Belgium. Cyclist units are also included on Divisional memorials, such as that to the British army’s 14th Light Division at Hill 60 near Zillebeke, and that to the cyclists of the Belgian army near Haelen.
...They have been used by standing national armies, insurgents, resistance groups and all manner of other organizations in time of war. After all this time, there is no reason to believe bicycles should not continue to be used by armies in the future. To have lasted for as long as they have, there must have been much wisdom in their use."
मिरजेला आम्ही एकाच घरात १९६१- १९८४ राहिलो. तो भाग त्या काळात खूप बदलला असे म्हणता येणार नाही, आम्हीच खूप बदललो....
पण काही बदल जन्म, मृत्यू,लग्ने, बदल्या, घरांचे नूतनीकरण यांमुळे होत राहिले...
असाच एक बदल म्हणजे आमच्या समोरच्या वाड्यात, १९७०च्या दशकात काही बदल होऊन, तिथे समोरच्या बाजूला, आमच्या घरासमोर एक दुकान तयार करण्यात आले आणि ते चालवायला एक दिवस नाना (पत्नी नव्हती) आणि त्यांची दोन अविवाहित मुलगे आले. ते सगळे राहायला नंतर त्या वाड्यातच होते.
त्यांच्या आणि आमच्या संबंधात काही कडू गॊड आठवणी आहेत पण त्या आत्ता येथे लिहित नाही.
लिहणार आहे ते: त्यांच्या बरोबर आलेल्या दोन विचित्र दिसणाऱ्या, बुटक्या , जुनाट पण तगड्या सायकली. आमच्या सायकलीसमोर तर त्या खूपच विचित्र दिसत असत. ते तिघे त्या सायकलींना दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या सायकली म्हणत असत. त्या त्यांनी विकत घेतल्या असाव्यात.
पहिले अनेक महिने (जो पर्यंत ते राहायला दुकानाच्या मागेच आले नव्हते तो पर्यंत) ते त्या सायकली बऱ्याच वेळा वापरत असत. नंतर त्यांचा वापर कमी झाला, त्या वाड्याच्या बाहेरच्या दरवाज्याला टेकवून उभ्या असत, शेवट त्या बहुतेक भंगारात गेल्या. त्या चालवावेसे मला एकदाही वाटले नाही.
अशा तर्हेने दुसरे महायुद्ध १९७०च्या दशकात आमच्या डोळ्यादेखत जिवंत होते!
Infantry on bicycles during the Blitzkriegs in 1939 and 1940.
courtesy: "The Military History of the Bicycle: the Forgotten War Machine" by John Norris , 2021
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.