Monday, June 24, 2024

मृणाल गोरे, मी आणि सध्याची "पुरोगामी" चळवळ...Mrunal Gore@96

 आज जून २४   २०२४, मृणाल गोरे यांची ९६वी जयंती आहे...

Sonal Shah, EPW, Aug 11 2012:

“Mrinal Gore, veteran politician and leader of the women's movement in Maharashtra, who passed away recently was the quintessential grass-roots leader who could also hold her own in the state legislature. A call from her would mobilise thousands of women on the streets of Mumbai and she tirelessly raised issues that affected the common citizen, from rising prices, shortage of water, sex determination tests to corruption in real estate. Mumbai's citizens, otherwise ever cynical about politicians, held her in great esteem and affectionately called her paaniwali bai - the water lady.”

 
मी शाळेत असताना (१९६५-१९७५) कै मृणाल गोरे माझ्या हिरो होत्या कारण त्यांच्या चळवळीचा भर ह्या गोष्टींवर होता - भ्रष्टाचार, महागाई, सामान्य महिलांचे प्रश्न... 
 
माझ्या माहितीप्रमाणे स्वतः त्या सरकारकडून कसल्याही सवलती पदरात पडून घेत नव्हत्या... त्यांचे आर्थिक आयुष्य अतिशय पारदर्शी होते... त्या अतिशय साधेपणाने रहात असत... 
 
त्या पुरोगामी होत्या आणि मला तसे पुरोगामी व्हायचे होते... आणि माझे आई-वडील (होते तोपर्यंत) आणि मी गोरेबाईं सारखे पुरोगामी आहोत... 
 
मी आयुष्यात भ्रष्टाचार केला नाही... अंधश्रद्धा, भविष्य यांच्या मागे लागलो नाही... जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद केला नाही.... माझ्या वडलांनी माझी मुंज केली नाही , मी माझ्या मुलाची मुंज केली नाही (बायको त्यावर अजून वैतागली आहे!)...
 
मिरजेत रहात असताना आमच्या कुटुंबाचे संबंध बहुजन समाजातील लोकांशी आणि अल्पसंख्यांकांशी, ब्राह्मणांबरोबरीला संबंधांपेक्षा जास्त चांगले आणि प्रेमाचे होते... माझे आर्थिक आयुष्य संपूर्ण पारदर्शी आहे... मी अतिशय साधेपणे राहतो... 
 
मला कन्नडा, बांगला बऱ्यापैकी समजते... भारतात अनेक ठिकाणी राहिल्यामुळे माझ्या कडे साने गुरुजींच्या आंतरभारती बद्दल आत्मीयता आहे... 
 
सध्याची पुरोगामी चळवळ सर्वव्यापी भ्रष्टाचारावर थयथयाट करताना मला कधीच दिसत नाही... एखाद्या कडे इतक्या assets कशा असा प्रश्न विचारत नाही.... साधेपणाचा, आंतरभारतीचा कधी पुरस्कार करत नाहीत...
 
भारतीय समाजातील शक्तिशाली (अगदी हौसिंग सोसायटीतील पदाधिकारी सुद्धा शक्तिशाली) लोकांच्या assets पहा... शून्ये मोजता येत नाहीत... 

हे विषय का महत्वाचे राहिले नाहीत ... फक्त युरोप आणि अमेरिकेतील पुरोगाम्यांचे मुद्देच का भारतात पुरोगाम्यांसाठी सर्वात महत्वाचे होऊन बसले? 
 
ह्या कारणामुळे ही "पुरोगामी" चळवळ माझी होऊच शकत नाही...
 
 

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.