Monday, June 03, 2024

Kafka's Century...एक शतक काफ्काचे हाडामासात नसणे

जी ए कुलकर्णी:
 
"...मला वाटते, फार मोठी नाव घ्यायची झाली तर Kafka, Camus and Dostoevsky हे अतिशय morbid होते. त्याच्या उलट तर मला वाटते , की अनुभवाने जर लेखकाला जीवनविषयक एखाद्या आकृतीची सतत जाणीव होत राहिली नाही , तर त्याचे लेखन मोठेपणी जरीची टोपी घालून हिंडणाऱ्या माणसाप्रमाणे बालीश वाटते. मराठीतील पुष्कळशी कथा अशी अगदी फुटकळ उथळ वाटते याचे कारण तेच. कोणते तुकडे हाती लागले यावरच आपले इतके समाधान असते, की तो कशाचा तुकडा असावा याकडे आपले लक्ष नाही. Kafkaची मते पटोत अगर न पटोत, Hardy देखील असाच , पण त्यांच्या लेखनावर अशा या universal reference चा शिक्का आहे. ..."
 
(२८/८/१९६३, पृष्ठ १२०, 'जी एंची निवडक पत्रे', खंड २, १९९८) ....
 
विलास सारंग:
 
"... काफ्काच्या 'मेटॅमॉर्फसिस' या सुप्रसिद्ध दीर्घकथेत जे घडत, ते वास्तविक भारतीय वाचकाला नवलाईचं वाटायला नको. माणसाचं एखाद्या प्राण्यात रूपांतर होणं ही गोष्ट पुराण भारतीय साहित्यात विपुल व परिचयाची आहे. दीड-एक शतक आपण पाश्चात्यांच्या 'वास्तववादी चष्म्यातून पाहायची सवय लावून घेतल्यामुळे 'आधुनिक' वाङ्मयात अशी घटित आपल्याला नवलाईची वाटतात. त्याचवेळी हेही आपल्याला अमान्य करता येत नाही की काफ्काच्या त्या कथेत जीवनातले काही खोल वास्तव प्रभावीपणे उघड केलं आहे...." 
 
(पृष्ठ १४, 'वाङ्मयीन संस्कृती व सामाजिक वास्तव', २०११)

"Don’t bend; don’t water it down; don’t try to make it logical; don’t edit your own soul according to the fashion. Rather, follow your most intense obsessions mercilessly."


माझ्या मुलाने प्रागच्य्या काफ्का म्युझियम मध्ये २०१९ साली काढलेला फोटो

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.