Tuesday, June 18, 2019

बांबू ,कडबा,फडके,मडके,सुतळी....तुमच्या ट्रेडमिलच्या मागे पहा कोण आहे ते....Chin Vi Joshi's Humour and Death


Anton Chekhov
"And I despise your books, I despise wisdom and the blessings of this world. It is all worthless, fleeting, illusory, and deceptive, like a mirage. You may be proud, wise, and fine, but death will wipe you off the face of the earth as though you were no more than mice burrowing under the floor, and your posterity, your history, your immortal geniuses will burn or freeze together with the earthly globe.”
—from "The Bet"


Paulie Walnuts, The Sopranos:
"In the midst of life, we are in death, or is it, In the midst of death we are in life? Either way we’re up the ass."

तुम्ही पहिली नसेल तर ह्या ब्लॉगवरची "...पोळुं दे आंतून तीतें...Grief-berg Hits C V Joshi, R K Narayan, Mark Twai" ही मे १०, २०१७ची पोस्ट ह्या पोस्टला पूरक म्हणून पहा. 

आचार्य अत्रे यांच्या 'हुंदके'. १९८९/ १९९७ पुस्तकात 'विनोद चिंतामणी' हा चिं वि जोशी यांच्या वर लिहलेला मृत्युलेख आहे- मूळ प्रसिद्धी  नोव्हेंबर २३, १९६३.

त्यातील एक उतारा अत्रे यांच्या कार्याच्या कॉपीराईट होल्डर्स च्या सौजन्याने सोबत देत आहे. गरज पडल्यास, डाउनलोड करून मोठा करून वाचा.

(मोठे करून वाचा)
ही गोष्ट जरी आताच्या काळात शहरातील तरुणांना समजली नाही तरी  विनोदी आहे.  पण मला विशेष वाटले चिं विं नी निवडलेल्या गोष्टीचे.

मृत्यू दुसऱ्या व्यक्तीला आलेला आहे पण अंत्यसंस्कारांच्या 'चिन्हां'मुळे चाळीतील शेजाऱ्यांचा गैरसमज होतोय.

पण तो खरंच खूप गैर समज आहे? का ती भविष्याची , कदाचित नजीकच्या, नांदी आहे? मृत्यू तुम्हाला आला नसेल पण तो तुमच्या दरवाजाच्या बाहेरच आहे. बांबू , कडबा , फडके, मडके , सुतळी हेच अंतिम सत्य , बाकीचे फसवे आहे... ट्रेडमिल वर मागे पहा कोण आहे ते!... हे तर सूचवित नाहीयत चिं विं?


आर्टिस्ट: Joe Dator

पुस्ती: स्वत: चिं वि जोशींनी व्यंगचित्रे काढली आहेत!