Saturday, December 22, 2018

स्पॅनिश साहित्यातील समुद्र अनुपस्थिती आणि समुद्र न पाहता समुद्र...Marathi Literature is Not Alone


दुर्गा भागवत:
"…देशबंधू दासांची आणखी एक गंमत सांगते. त्यांनी 'सागरसंगीत' म्हणून समुद्रावर कविता लिहिल्या आहेत. समुद्रावर चाळीस कविता लिहिणारा हा जगातला एकुलता एकच माणूस. त्या कवितांबद्दल साने गुरुजींनी इतक सुंदर, इतक सुंदर लिहिलंय, की ते वाचल्यावर मला बंगाली भाषा शिकायचा मोह झाला. मी शिकले बंगाली आणि मूळ बंगालीतून 'सागरसंगीत'च मराठी भाषांतर केल…" ("ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी", लेखक : प्रतिभा रानडे, पृष्ठ: 59, 1998) 
जी ए कुलकर्णी : 
"... समुद्राचा अवजड करडा पडदा स्थिर आहे. त्याच्यात आपली प्रतिबिंबे आहेत म्हणून आपण अस्तित्वात आहो  असे निःशंकपणे खडकांना वाटते. व  ते अलिप्तपणे उभे आहेत. 
        समुद्र केवळ निरीक्षक आहे..."
('अस्तिस्तोत्र', १९७१, 'सांजशकुन', १९७५,२०१५) 
विलास सारंगांचे खालील विधान केंद्रस्थानी ठेवून मी 'Marathi Literature at Sea!...मराठी साहित्यात समुद्राच वास्तव किती सातत्याने दुर्लक्षित केलं आहे' नावाची पोस्ट ऑगस्ट ५ २०१३ रोजी लिहली. ती जरूर पहा आणि त्याखालील कमेंट्स पण पहा.  

: "… मराठी साहित्यात समुद्राच वास्तव किती सातत्याने दुर्लक्षित केलं आहे, हे माझ्या विवेचनाच सार होतंआपण वास्तवाच्या -वाङमयीन सामग्रीच्या- केवढ्या मोठ्या भांडाराला मुकतो आहोत, हे माझ्या लेखात निर्देशित केलं आहे...मराठी वाङमयातील समुद्राची अनुपस्थिती मराठी समाजाच्या संरचनेशी कशी निगडीत आहे, हे माझ्या लेखात स्पष्ट केलेलं आहे."
 ("वाङमयीन संस्कृती सामाजिक वास्तव", २०११, पृष्ठ ६६-६७)

नोव्हेंबर २०१७ मध्ये मी हॉर्हे लुईस बोर्हेस (Jorge Luis Borges) यांचे 'Conversations, Volume 1', २०१४ पुस्तक चाळत होतो.  बोर्हेस यांच्या दीर्घ मुलाखतीचे हे पुस्तक आहे.     


"... FERRARI. The sea.

BORGES. The sea, yes, that’s so present in Portuguese literature and so absent in Spanish literature. For example, Quixote . . .

FERRARI. Set on a tableland.

BORGES. The Portuguese, on the other hand, the Scandinavians and—yes—the French since Hugo, feel the sea. Baudelaire felt it; Rimbaud in his ‘Le Bateau ivre’ felt a sea that he had never seen. Coleridge wrote ‘The Rime of the Ancient Mariner’ without having seen the sea; when he did see it, he felt betrayed. And Rafael Cansinos Assens wrote an admirable poem about the sea. I congratulated him and he answered, ‘I hope one day to see it.’ That is, the sea in Assens’ imagination and the sea in Coleridge’s imagination were superior to the mere sea of geography (laughs)...."

कोलेरिज यांनी समुद्र न पाहता त्यांची जगप्रसिद्ध कविता लिहली होती! म्हणजे समुद्र न पाहता सुद्धा एखाद्याला मोठ्या प्रभावीपणे समुद्राबद्दल लिहता येते. 

Engraving of a scene from 'The Rime of the Ancient Mariner'

'The frozen crew and the albatross' by Gustave Doré (1876)

No comments:

Post a Comment

Welcome!

If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.

Comment may get published but not replied to.

If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.

Only if you agree to this, post your comment.