मिरजेचा पाऊस, नेहमी आनंद देणारा, सर्व घ्राणेंद्रियांना जागवणारा, किंचित कमी पडणारा पण खाताना एक घास कमी खाव म्हणतात तस, कधी छत्रीची गरज नाही, कधी रस्ते तुंबलेले नाहीत, बेडकांना बाहेर आणून बोलत करवणारा, हवा गार पण जास्त नाही करणारा, झाडांना डोलवणारा, त्याचे नुसते थेंब पडलेले बघताना पण आनंद देणारा, कागदाच्या होड्या सोडायला उद्युक्त करणारा, चिंचा आणि तिचा कोवळा पाला, बुचाची आणि बकुळीची फुले बरोबर आणणारा..असा पाऊस कलिदासाला अनुभवायला मिळायला हवा होता.