मे २०२४ मध्ये हे चित्र ट्विटर वर पाहिले आणि थोडा निराश झालो....
मी आसाम मध्ये १९८९-९२ मध्ये चहाच्या बागांच्या ऑफिस मध्ये कामाला होतो...बागेत चहाची पाने काढण्याची काम करणाऱ्या स्त्रिया मला चांगल्या माहित होत्या, त्यातील एक आमच्या घरी कामाला सुद्धा होती...
वास्तवात त्या स्त्रियात आणि चित्रातील स्त्रियांमध्ये काही साम्य मला तरी वाटत नाही. आसाम मधील कामगार स्त्रियांमध्ये अॅनिमिया मोठ्या प्रमाणात होता, अनेक स्त्रिया मद्यपी होत्या, तांबूल सेवन करणाऱ्या होत्या (आसामी तांबूलचा वास मला सहन होत नसे)... मलातरी बहुतेक सगळ्या गरीब आणि गांजलेल्या वाटत, त्यांचे आणि आमचे जीवन अतिशय वेगळे आहे असे मला वाटत असे...
पूर्वीच्या काळात ब्रिटिश आणि भारतीय प्लँटर्स नी त्यांचा लैंगिक फायदा सुद्धा घेतला होता असे म्हणत (मी सुद्धा तशा गोष्टी माझ्या काही विद्यमान कलिग्ज बद्दल ऐकल्या होत्या) ... आजही आसाम मध्ये, क्वचित, ब्रिटिश प्लँटर्सची संतती किंवा त्यांची पुढची पिढी त्यांच्या त्वचेचा/डोळ्याचा/केसाचा रंग पाहून ओळखू येते... बऱ्याच अशा स्त्रियांना त्या पुरुषांनी नंतर 'सोडून' दिले आणि त्या 'single parent' झाल्या...
Julie Christie ह्या जगप्रसिद्ध अभिनेत्रीची विकिपीडिया एन्ट्री पहा: "...Christie was born on 14 April 1940 at Singlijan Tea Estate, Chabua, Assam, British India, to Rosemary, a Welsh-born painter and Frank, who ran the tea plantation where she grew up. She has a younger brother, Clive, and an older (deceased) half-sister, June, from her father's relationship with an Indian tea picker on his plantation..."
आज २०२४ साली मी जवळजवळ ४० वर्षांपूर्वीच्या लिहलेल्या गोष्टी कदाचित चांगल्या साठी बदलल्या असतील
