Tuesday, September 30, 2025

Mushrrom Jungle in Our Miraj

मिरजेला (१९६१-१९८५) आमच्याकडे भरपूर इंग्लिश पुस्तके होती, वडील एम ए (इंग्लिश) होते आणि कॉलेज मध्ये इंग्लिश शिकवायचे, पुण्यात शिकले होते, त्यांनी ती सगळी पुस्तके विकत घेतली होती... 

पण आमच्या कडे ती ठेवायला नीट जागा नव्हती, त्यामुळे ती सगळी आमच्या वरच्या खोलीच्या माळ्यावर  पडली होती... 

आम्ही मोठे होत गेलो, आमचे हात जास्त वळवळू लागले तशी त्यातील अनेक खाली आली, त्यातील बहुतेक पेपरबॅक होती, अगदी classics सुद्धा.... 

आम्ही मराठी शाळेतील मुले होतो, आम्हाला इंग्लिश अत्यंत वाईट पद्धतीने शिकवले जात असे, त्यामुळे त्या भाषेतील पुस्तके वाचावीशी वाटायची नाहीत, पण पुढे सुट्टीत दुपारी येणाऱ्या boredom ला उपाय (आम्ही कोणत्याही मोठया सुट्टीत नातेवाईकांकडे जात नसू) म्हणून ती पुस्तके वाचायला सुरवात झाली .... 

माझ्या वडलांनी पहिल्यांदाच जाहीर केले: पुस्तके जरूर आणि कोणतीही  वाचा, पण मला एकाही शब्दाचा अर्थ विचारायचा नाही ... पुस्तक कळत नसले तरी वाचत जायचे....

Erich Maria Remarque सारख्या लेखकाची सगळी पुस्तके आम्ही हळूहळू वाचून काढली! सर्व पेपरबॅक मध्ये होती.... 

First published October 1, 1993

Goodreads : "Cheap paper and hard covers, the paperbacks of the postwar period were intended to sell in large numbers, and they did. Surprisingly this period of British literary history has never been documented before. So here at last it is, a book for the scholar, the collector or the reader. Steve Holland's study of PAPERBACKS will evoke memories for some, and enlighten others, of the blossoming of the modern paperback from the MUSHROOM JUNGLE of postwar back street publishing houses.

This book reveals the origins and history of these publishers, together with the story of popular authors and artists of the period. In so doing it has done much to preserve an endangered part of our recent cultural heritage."