Friday, August 22, 2025

२०व्या शतकातील तीन मोठे भारतीय कलावंत (कमी आयुष्य लाभलेले)...Gadkari, Dalal and GA

 २०व्या शतकातील तीन मोठे भारतीय कलावंत (कमी आयुष्य लाभलेले) ह्या पोस्ट मध्ये एकत्र...

जी. ए. कुलकर्णी १९२३-१९८७, २८-१०-१९७८:


"... आम्हाला मॅट्रिकला असता गडकऱ्यांची (एक) 'चिमुकलीच कविता' अभ्यासाला होती. एका छोट्या मुलीवर लिहलेली ही एक मोठी कविता . त्या मुलीच्या एका गालावर तीळ आहे. तर गडकरी सांगतात , की ती तीळ म्हणजे त्या मुलीचे भाग्य लिहिताना विधीने दिलेले दशांश चिन्ह आहे! ते वाचताच (मला आजही आठवते) तो तास कसा कापराप्रमाणे भर्रकन जळून गेला..."

 (पृष्ठ ६५, 'जी.एं. ची निवडक पत्रे: खंड १', १९९५) 


(प्रत्यक्षात कवितेत तीळ नाही तर गोंदण आहे.)

"...
तिलक गोजिरे गोंदवणाचे हिरव्या रंगाचे,
शुभ्र मुखावर तुषार कुठल्या दिव्य तरंगाचे !
निळ्या नभीं वर शुभ्र तारका जमवितात मेळ,
शुभ्रमुखनभीं इथें निळ्याशा तारांचा खेळ !
(इचा) उद्याचा धनी कोण , हें ठरवावें म्हणुनी,
पुण्याईचें गणित करित विधि दशांशचिन्हांनीं ! ..."

राम गणेश गडकरी १८८५- १९१९, "वाग्वैजयंती" 

दीनानाथ दलाल यांच्या अप्रतिम चित्रात   १९१६-१९७१ तीळ आणि गोंदण दोन्ही नाही पण छोट्या मुली आहेत