Thursday, July 10, 2025

सपाट, नाजुक, नखरेबाज/ बिलगुन गेल्या किती चंपल्या;...Vincent van Gogh, Shoes

 

माझ्या लहानपणी दाराबाहेर किंवा घरात काढून ठेवलेल्या चपला हा एक मोठा विषय असे... (त्याचे महत्वाचे कारण घराच्या उत्पन्नाच्या तुलनेत चपला अत्यंत महाग असत)

माझे वडील मिरजेत १९६८ च्या सुमारास इंग्लिश चा क्लास कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी (अनेक मुले आणि मुली) आमच्या घरीच माडीवर काही काळ घेत असत... काही वेळा प्राथमिक शाळेतील मी "मजा" म्हणून त्या घरात काढून ठेवलेल्या चपला मिक्स करून टाकत असे ... 
 
आणि ते जरी केले नाही तरी चपला न्याहाळणे काही वेळा होत असे - झिजलेल्या, कधी रंगीत, कधी किंचित high हिल्स , काही नाजूक, नव्या, जुन्या , विटलेल्या, काही अंगठा तुटलेल्या.. 
 
मर्ढेकरांच्या भाषेत:
 
"... सपाट, नाजुक, नखरेबाज
बिलगुन गेल्या किती चंपल्या;
किती रांगडी ठसकेदार
वहाण गेली दावित टिकल्या !..."
 
('फलाटदादा, फलाटदादा', पृष्ठ ४७, मर्ढेकरांची कविता, १९५९/१९७७)
 
फलाटदादा सारखे हे आमच्या घराच्या उंबरठ्याला विचारता आले असते!
 
पिंगळावेळ, १९७७ चा एपिग्राफ आहे:
 
"तीर्थरूप आबांस,
डोळे उघडुन उठून बसत मी तुम्हाला नीट
पाहण्यापूर्वीच तुमची पाउले उंबऱ्याबाहेर
पडली होती."
 
त्या पावलांनी घातलेली पादत्राणे यावर मी एक ब्लॉग पोस्ट जुलै २९ २०१५ रोजी लिहली होती...
 
अशीच पादत्राणांची एक जोड कलेच्या इतिहासात अमर झाली आहेत.. 
 
"An acquaintance of Van Gogh’s in Paris described how he bought old work shoes at a flea market. Vincent then walked through the mud in them until they were filthy. Only then did he feel they were interesting enough to paint."
 
Vincent van Gogh, Shoes (1886)