Monday, March 31, 2025

तुम्ही कधी डेसी आणि डेका मेट्रिक पद्धतीत वापरले का? Have You Ever Used Deci and Deca of the International System of Units (SI)

भारताने सोबतच्या जाहिरातीत (वाङ्मय शोभा ऑक्टोबर १९५८) दाखवल्याप्रमाणे  मेट्रिक पद्धत ऑक्टोबर १९५८ साली स्वीकारली.

मी १९६५ साली मिरजेच्या भारत भूषण या मराठी शाळेत पाहिलीत गेलो आणि पुढील दोन-तीन वर्षांत आमच्या कडून मेट्रिक पद्धत  घोटून घेतली गेली , मी स्वतः मैल, फूट, इंच, यार्ड, फर्लांग वगैरे शब्द तुरळक प्रमाणात तो पर्यंत आणि नंतरही वापरले होते/ आहेत  (आजही आपण फूट, इंच वापरतोच)... 

आम्हाला घोकायचे गाणे होते मिली-सेंटी-डेसी -मीटर- डेका- हेकटो -किलोमीटर ...अंकगणितात पण हे सगळे यायचे... 

पण मी त्यातील  डेसी, डेका अंतरासाठी, वजनासाठी, आकारमानासाठी  ना कधी वापरले आहे , ना वापरल्याचे ऐकले आहे!