Friday, May 10, 2024

कै श्रीधर जोगळेकर सरांची टिकलीची शिस्त...Joglekar Sir and Bindi

मिरजेत असताना मी 1973 (9 वी) ते 1978 (engg चे तिसरे सेमीस्टर) त्यांच्या तुफान लोकप्रिय गणिताच्या क्लास ला जात असे, अतिशय उत्तम शिक्षक, शब्दशः जीव टाकून समाजसेवा करणारा मनुष्य, अनेक मुलामुलींकडून एक पैसा सुद्धा फी न घेणारा, पैसा हे जीवनाचे ध्येय नसणारा असा त्यांचा लौकिक होता...
 
सर appendicitis फुटून अतिशय कमी वयात, 1978 साली, वारले, आपली लहान मुलगी व पत्नी मागे ठेवून, ज्याचे दुःख मी आजही करत असतो, आजही तो दिवस विसरलेलो नाही...
 
तर आमच्या सरांच्या क्लास ला अनेक मुली येत आणि सरांचा एक नियम होता की प्रत्येक हिंदू मुलीच्या कपाळावर कुंकू पाहिजे...
 
एखादीने कुंकू लावले नसेल किंवा ते पुसले गेले असेल तर ती मुलगी लाल पेन्सिल मिळवून आपल्या कपाळावर कुंकू काढून घेत असे, हे एखाद्या वेळी जमले नाही तर सर त्या मुलीला बाहेर काढत असत...
 
कुठल्याही मुलीला, तिच्या पालकांना, किंवा समाजातील इतर कोणाला सरांचा हा नियम जाचक वाटला नाही...
माझ्या बायकोच्या कपाळावर कुंकू नसेल तर मी तसे लगेच बोलून दाखवतो, मी तिला कुंकू लाव असे कधी सांगत नाही, मी तिला लग्नानंतर मंगळसूत्र घालू नकोस म्हणून सुचवले होते, त्याप्रमाणे ती ते अनेक वेळा घालत नसे, आज नेमाने घालत नाही...
 
पण मला हिंदू स्त्रीचे पांढरे कपाळ आवडतं नाही..
 
मी स्वतः लहानपणा पासून कपाळावर गंध, विभूती लावायची सवय लावून घ्यायला पाहिजे होती असे मला वाटते...
ज्यावेळी आयआयटी मद्रास ला गेलो त्यावेळी अनेक स्त्री पुरुषांची भरलेली कपाळे बघून बरे वाटत असे...