चिंतामण विनायक वैद्य:
"... सहाही ऋतूंचे वर्णन असणे हे एक महाकाव्याचे लक्षण समजले जाते. ऋतूंची वर्णने रामायनाइतकी सुंदर दुसऱ्या कोठेही नाहीत. ... वर्षाऋतूचे वर्णन वाचीत असता आपण पावसात उभे असून पावसाच्या धारा आपल्या अंगावर पडत आहेत की काय असा भास होतो. त्याचप्रमाणे थंडीचे वर्णन करताना "गोदावरीचे पाणी पिण्याकरिता जे हत्ती आले त्यांनी सोंडेने पाण्यास स्पर्श करताच त्या मागे घेतल्या" असे कवीने जे म्हटले आहे, त्यावरून कवीची अवलोकन शक्ती किती सूक्ष्म व दांडगी आहे याची कल्पना येते. दुसऱ्या कोणत्याही काव्यापेक्षा या बाबतीत रामायणाचा नंबर वर लागतो. ..."
('संस्कृत वाङ्मयाचा इतिहास', 'रामायण', १९२२-१९९४, पृष्ठ ८०)