माझ्या आणि रामाच्या नात्या बद्दल खालील उताऱ्यापेक्षा जास्त चांगले लिहता येणार नाही...
श्रीनिवास विनायक कुलकर्णी, 'आम्ही वानरांच्या फौजा', "डोह", १९६५:
"... थोरली आई कुणाकुणाच्या नावाचा एक घास तोंडात भरवी. पानातच हळुवारपणे हात धुवी. आपल्याजवळच्या दुलईत गुरगटून घेई. अंगभरच्या गुंगीवर मऊ हात फिरवी. प्रेमाने थोपटी आणि अंधुकसे सांगत राही:
"बरं का, आपली आणि त्या मोठ्ठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होते आहे...तो गोकुळात कृष्ण म्हणून आला तेव्हा आपण गोपाळांच्या मेळ्यात होतो...तो रामराजा होता त्या वेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजांत होतो...
तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या मेळी
तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा..."
नेहमीच मी त्या वानरांच्या फौजेत असतो...