Friday, December 08, 2023

तू गडे फुलांची राणी...Flower by N V Tilak and Nagamachi Chikuseki

ना. वा. टिळक :

वन सर्व सुगंधित झाले / मन माझे मोहुन गेलेकितीतरी

 

 मी सारे वन हुडकीले

फुल कोठे नकळे फुलले - मज तरी

स्वर्गात दिव्य वृक्षास

बहर ये खास

असे क्ल्पीले - असे क्ल्पीले/ मन माझे मोहुन गेले - कितीतरी

 

 परी फिरता फिरता दिसले

फुल दगडाआड लपाले - लहानसे

दिसण्यात फार ते साधे

परी आमोदे

जगामधी पहिले - जगामधी पहिले/ मन माझे मोहुन गेले - कितीतरी

 

मी प्रेमे वदलो त्यासी

का येथे दडुनी बसशी - प्रिय फुला?

तू गडे फुलांची राणी

तुला गे कोणी

रानी धाडिले- रानी लावीले? / मन माझे मोहुन गेले - कितीतरी

  

ते लाजत लाजत सुमन

मज म्हणे थोडके हसुंन - तेधवा

निवडले प्रभूने स्थान

रम्य उद्यान

तेच मज झाले- तेच मज झाले / मन माझे मोहुन गेले- कितीतरी


 Flower by Nagamachi Chikuseki, mid 18th-early 19th century