Al Jaffee ह्या महान व्यंगचित्रकाराचे एप्रिल १० २०२३ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले....
MAD ह्या जगप्रसिद्ध मासिकासाठी त्यांनी केलेले योगदान तोंडात बोट घालवणारे आहे... "Snappy Answers to Stupid Questions" हे त्यांचे सदर मला फार आवडे, पण मी त्याचे प्रयोग भारतात प्रत्यक्ष माणसांवर केल्यावर काही माणसे वैतागली!...
त्यांचे सगळ्यात मोठे संशोधन होते - १९६४ साली मॅड साठी त्यांनी सुरु केलेले "Fold-In", म्हणजे अंकात एका पानभर चित्राला मधून उघडले की आत दुसरे चित्र...आणि ती दोन्ही मोठी चित्रे परस्परांशी जोडलेली असत...
ज्यांनी पूर्वी आवाज किंवा इतर काही दिवाळी अंक पाहिले असतील त्यांना हा प्रकार चांगला परिचित आहे (आवाज मध्ये आतील चित्र थोडे त्यावेळच्या मानाने "चावट" असायचे.) मला लहानपणी Fold-In प्रकार फार आवडत असे. आवाज आणि मराठी वाचकांवरती Al Jaffee यांचे ऋण आहेत.
आवाज सारखी लोकप्रियता माझ्यामते दुसऱ्या कोणत्याही मराठी दिवाळी अंकाने अनुभवलेली नाही... तो अंक महाग असे... पण काही दिवसात तो बाजारातून संपला असे..
तर ह्या आवाज साठी दीनानाथ दलालांनी १९६५ च्या दिवाळी अंकासाठी काढलेली चित्रे सोबत... नुकतेच भारत- पाकिस्तान युद्ध सप्टेंबर मध्ये संपले होते... लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते .. समोर आकाशात माओ, चाऊ एन लाय वगैरेंची मुंडकी आहेत... खाली आयुब खान आहेत ...
कृतज्ञता : दलाल यांच्या कलाकार्याचे कॉपीराईट होल्डर्स