Tuesday, September 26, 2023

Dev Anand@100...कोणी अमरपट्टा घेऊन आले असेल तर ते देव आनंद!

#DevAnand100

Roger Ebert: 

“Hollywood dialogue was once witty, intelligent, ironic, poetic, musical. Today it is flat. It sometimes seems as if the movies are more mediocre than ever, more craven and cowardly, more skillfully manufactured to pander to the lowest tastes instead of educating them.”

 मला वाटले होते, जगात कोणी अमरपट्टा घेऊन आले असेल तर ते देव आनंद असतील. पण ते एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे वयाच्या 'केवळ' ८८व्या वर्षी वारले. 

पण २०व्या शतकातील हिंदी सिनेमा आणि त्याच्या संबंधित अनेक लोकांप्रमाणे ते माझ्या जीवनाचा भाग आजही आहेत. 

स्वातंत्र्यापूर्वी पूर्वीच्या पिंढ्यांनी पाहिलेली बहुतेक स्वप्ने ('जागते रहो' मध्ये दाखवल्याप्रमाणे) चकणाचुर झाली  पण त्याजागी हिंदी सिनेमाने अनेक नवीन स्वप्ने दिली. भारतातील गरिबी आणि इतर अनेक प्रश्नांवर तोडगा काय असेल तर सिनेमा (विशेषतः हिंदी) आणि त्यातील संगीत.

ते देणाऱ्यांमध्ये देव आनंद एक प्रमुख होते. 

त्यांच्या दोन तीन गोष्टी मला उठून दिसत आल्या- त्यांचे आईवरचे प्रेम , त्यांचे उच्च शिक्षण, त्यांचे आणीबाणीच्या सुमारास काही काळच  टिकलेले राजकारण आणि १९७१ सालापर्यंत त्यांच्या सिनेमातील विविधता. 

१९७८ नंतर मी त्यांचा एकही नवा सिनेमा पहिला नाही पण माझा त्यांच्यातील इंटरेस्ट १९७१ सालच्या त्यांच्या सिनेमांनंतर संपला होता.  १९७०च्या विजय आनंदच्या आणि त्यांच्या जॉनी मेरा नामची जादू अजून माझ्यावर आहे, माझ्या मुलाला सुद्धा तो सिनेमा प्रचंड आवडतो.


 

गीता बाली आणि रशीद खान यांच्या समवेत , १९५१ च्या सुमारास

 

कलाकार : आर के लक्ष्मण