Sunday, June 18, 2023

१९५०साली मराठीत कार्टून्स वाईट किती असावीत!...आणि का असावीत?...Bad Cartoons...Why?


मला मराठीतील फार कमी कार्टूनिस्ट आवडतात ...वसंत सरवटे, (माझा भाऊ) अभिमन्यु कुलकर्णी, शि द फडणीस, श्याम जोशी, गवाणकर , ('आवाज' वाले) चंद्रशेखर पत्की, काही प्रमाणात बाळ ठाकरे, आणखी एखादे नाव जे मी विसरत असेन.

मराठी मासिकातून इतर लेखन जरी बर असल तरी कार्टून सुमार असतात.

त्याचे एक उदाहरण २०१७साली समोर आले: वाङ्मय शोभा मासिकाचा सप्टेंबर १९५०च्या अंकातील व्यंगचित्रे पहा:

 
ह्या दोन व्यंगचित्रांच्या खाली सही : चिं वि जोशी वाटतीय, आणि जर ते चिमणराव कर्ते चिं वि जोशी असतील, तर प्रश्न पडतो की त्या महान लेखकाने हा प्रयत्न का केला असावा ?



हे कार्टून तर समजलच नाही. बायकोच्या स्वैपाकाच्या दर्जावर आहे. पहिली ओळ ठीक. पण दुसरी ओळ पूर्णपणे फसली आहे. 

पंच १८४१साली ब्रिटन मध्ये सुरु झाले होते, १९२५साली दि न्यू यॉर्कर चा जन्म झाला होता. कितीतरी आदान प्रदान भारत, इंग्लंड, अमेरिका या देशात चालू होत. १९५० पर्यंत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि चिं वि जोशींनी उच्च दर्जाचे विनोदी लेखन मोठ्या प्रमाणात केले होते.  

 तरी व्यंगचित्र इतकी वाईट- कॅपशन्स वाईट, रेखाटन वाईट-  का: ...?