Monday, January 16, 2023

अभ्यासातील फ्लोरा का अंतिम परीक्षेतली ?...Flora and the Zephyrs

जी. ए. कुलकर्णी : "... ऑर्फियसने उत्कंठेने वाद्य हातात घेतले व स्वर निर्माण करण्यास सुरवात केली... त्यावेळी हातांतील कंकणांचा आवाज करत, आंतरसालीसारख्या कोवळ्या पावलांनी सूर्यप्रकाश सरकवत एक सौन्दर्यवती युवती आली, आणि निर्भर आनंदाने तिने ओंजळभर फुले उचलली..." 

(पृष्ठ ५, 'ऑर्फियस', 'पिंगळावेळ', १९७७)

Flora आणि  Zephyrs दोन्ही रोमन/ ग्रीक देव. Zephyrs म्हणजे पश्चिम-पवन (मरुत) आणि फ्लोरा (the goddess of the flowering of plants), त्याची पत्नी. 











हे चित्र आहे (Copyright The Hopkins Collection 2021) जॉन वॉटरहाऊस यांनी १८९८ साली काढलेले. त्या बद्दल मिळालेली माहिती अशी:

"Flora and the Zephyrs takes its subject from Ovid's Fasti, which is a verse chronicle of the Roman calendar, and which incorporates the mythologies and historical legends of Rome where they can he associated with specific times of the year. Waterhouse's painting shows the moment when Zephyr first set eyes upon and fell in love with Flora, as she gathered flowers in the fields with her maidens and children.  He flies down to her, accompanied by his winged companions, and captures her by casting a garland of white flowers around her."

पण या चित्रातील फ्लोरा पेक्षा जॉन वॉटरहाऊस यांनी वरील चित्राच्या तयारीकरता काढलेली फ्लोरा (study of Flora) मला खूप जास्त आवडली. 

किती मानवी वाटते, तिच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता अगदी परिचयाची.