२०१८साली मला पुलंची खालील पुस्तके आवडतात:
तुझे आहे तुजपाशी १९५७, नस्ती उठाठेव १९५२, रवींद्रनाथ : तीन व्याख्याने १९८० आणि गुण गाईन आवडी १९७५.
'गु. गा. आ.' मधील काही लेख माझ्यासाठी मी कोणत्याही भाषेत वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी आहेत- उदा वसंत पवार, वसंतराव देशपांडें, कुमार गंधर्व यांच्या वरील लेख. वसंत पवारांना पुल काहीकाळासाठी अक्षरशः जिवंत करतात. महाराष्ट्राची संगीतातील श्रीमंती आपल्याला अशा लेखांतून जाणवते.
पण मला त्यांचा इरावती कर्वेंवरचा लेख अजिबात आवडला नाही. अगदी उथळ वाटला.
आणि त्याच्या उलट इरावती कर्वेंवरचा दुर्गा भागवतांचा लेख. पुलंचा सामान्य लेख जिथे संपतो तिथे दुर्गाबाईंचा सुरु होतो. पुल जी उंची त्यांच्या वर उल्लेखिलेल्या चांगल्या लेखात गाठतात ती दुर्गाबाई ह्या लेखात गाठतात.
मला ह्या गोष्टीच वाईट वाटत आलय की गुणग्राहक पुलंनी दुर्गाबाईंच्या महानतेबद्दल विस्ताराने लिहल नाही. विलास सारंगांनी विस्ताराने केलेले दुर्गाबाईंचे कौतुक वाचल्यानंतर हे शल्य वाढलय.
दुर्गाबाई ह्या माझ्यामते २०व्या शतकातील सर्वोत्तम मराठी लेखक (आणि जगातील सर्वोत्कृष्टांमध्ये एक) होत्या. त्यांचे गुणवर्णन करून आपण आपली उंची वाढवत असतो.
डावीकडली पान : "आठवले तसे", १९९१ , कृतज्ञता : दुर्गाबाईंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स
उजवीकडील पान : गुण गाईन आवडी, कृतज्ञता: मौज प्रकाशन आणि पुलंच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स