Wednesday, February 16, 2022

पूर्णात् पूर्णमुदच्यते...Getting Better All the Time?

Artist: Saul Steinberg, 1965

जी ए कुलकर्णी:
".... मग अखेर हा गोलक  आहे तरी कसला? क्षणाक्षणाला भीषण स्फोट करत अनेकरंगी चांदण्या आभाळात फेकणारा, पण आभाळातील चांदण्यांचा विध्वंस करणारा; एका बाजूला सहस्त्र डोळ्यांची रास धारण करणारा तर दुसऱ्या बाजूला निव्वळ रित्या खोबण्यांच्या दैवी खुणांची चाळण मांडणारा, एका बाजूला खडक वितळवणाऱ्या धगीने पेटलेला, तर दुसऱ्या जागी अंगातले रक्त गोठवणारा थंडगार.
हा गोलक आहे तरी कसला ? की तो कसला हे सांगता येत नाही हेच अखेरचे खरे उत्तर?...
... आणि शेवटी राहते काय? तर सगळे नोंदून, पण काहीच अंगाला लावून न घेता निर्लेप, निर्विकार राहणारे हे एवढेच भिंग.
पूर्णात् पूर्णम् उदच्यते ।"
(पृष्ठ ४५-४६, स्वामी, पिंगळवेळ, १९७२)