"सूर कशाचे वातावरणी ?
सळसळ पानांची ? वा झरणी
खळखळ, ओहोटीचे पाणी ?
किलबिल शिशिरी केविलवाणी ?
कुणास ठाऊक ! डोळ्यां पाणी
व्यर्थ आणतां; नच गाऱ्हाणी
अर्थ; हासुनी वाचा सजणी.
भास ! --जरी हो खुपल्यावाणी. "
(
बा सी मर्ढेकर, मर्ढेकरांची कविता , पृष्ठ ३, १९५९ / १९७७)
Artist:
Bliss / Martin