Tuesday, June 29, 2021

Shripad Krushna Kolhatkar...श्रीपाद कृष्ण कोल्हटकर@150

आज, जून २९ २०२१, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची १५०वी जयंती

दोन-तीन गोष्टी लिहाव्याश्या वाटतात...

त्यांची सर्व नाटक आता वाचायला भिकार वाटतात (पण रा ग गडकऱ्यांनी त्यातून बरेच उचलेले आहे!) पण त्यांच्या ताकतीचा विनोद (मराठी गद्यात) पुन्हा निर्माण झाला नाही. मी कधी कधी कल्पना करत असतो की आज कोल्हटकरांनी कशा कशा वर लिहलं असत... वेळ पुरला नसता त्यांना...

त्यांच्या पत्रांची दोन पुस्तके मी वाचली आहेत. त्यातून त्यांचे जे विलक्षण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभ राहत ते मला एकीकडे हसवत असत आणि एकीकडे खिन्न करत. ती पत्र वाचून वाटत त्यांच्याशी जाऊन गप्पा माराव्यात...त्यांना आणखी बोलत करावं!

हा मनुष्य खूप दूरदर्शी होता. हरि नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो?', १८९० कादंबरीचे परीक्षण लिहताना ते म्हणतात:

"रा. आपट्यांनी स्त्रियांच्या दुःखाची कहाणी सांगितली आहे तशी मागासलेल्या जातीच्या दुःखाची सांगितल्यास ती मिसेस स्टौच्या 'टॉम काकाची कोठडी' या कादंबरीच्या खालोखाल क्रांतिकारक होईल अशी खात्री वाटते. "

त्र्यंबक शंकर शेजवलकर , र. धों कर्वे अशा प्रचंड ताकतीच्या पण दुर्लक्षीत अशा व्यक्तींना त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिल. 'समाजस्वास्थ्य' मध्ये आलेला एकमेव मृत्युलेख म्हणजे त्यांच्यावरचा!

पण आपण कोल्हटकरांना जवळ, जवळ विसरलो आहोत. एखाद्या भाषेत त्यांचे विनोदी लेख सुद्धा रंगभूमीवर आले असते... आज बाजारात त्यांचे (किंवा त्यांच्याबद्दलचे) एकच पुस्तक मिळते- 'सुदाम्याचे पोहे' आणि ते सुद्धा abridged....
 

 साभार : "एक सर्वमंगल क्षिप्रा", हरी विष्णू मोटे,१९८०