Saturday, May 08, 2021

जीएंची स्वामी कथा आणि कोविड चे आणखी एक अंग- ऑक्सिजन अभावी मृत्यू ...Oxygen and Remdesivir Instead of Food and Petrol of Mad Max 2

 स्वामी कथे मुळे  quarantine परके वाटत नाही कारण स्वामी ला एक प्रकारच्या quarantine मध्येच टाकले आहे. कोविडचा हा एक पैलू झाला. 

दुसरा पैलू हा 

जी. ए. कुलकर्णी:

"... तो मांडी घालून अंथरुणावर बसला. येथे तर हवा अगदी जडशिळा  झाली होती व श्वासोच्छवास करताना कापडाचा खरबरीत पट्टाच श्रमाने आत-बाहेर होत आहे असे त्याला वाटू लागले होते. परंतु त्याच्या डोळ्यांसमोर मात्र एकाच दृश्य होते- हिरव्या रसाच्या उत्साहाने शेकडो पाने धारण करून वर चढत असलेला आपला वेल !..."

(पृष्ठ ४९, 'स्वामी', 'पिंगळावेळ', १९७७)

२०२१ साली शालेय जीवनानंतर पहिल्यांदाच ऑक्सिजन हा शब्द इतक्यावेळी वाचला किंवा ऐकला. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर साठीची लोकांची खटपट जॉर्ज मिलर यांच्या Mad Max 2, १९८१ ह्या महान चित्रपटाची आठवण करून देणारी. 

"Following a global war and the collapse of civilization after oil supplies were nearly exhausted, the world is in a state of barbarism. Haunted by the death of his family, former policeman Max Rockatansky now roams the desert wilderness of a post-apocalyptic Australia in a scarred, black, supercharged V-8 Pursuit Special. Scavenging for food and petrol, Max's only companion is an Australian Cattle Dog..." (courtesy: Wikipedia)

Food and petrol च्या ऐवजी ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर इंजेक्शन... 



 courtesy: Warner Bros.