बा. सी. मर्ढेकर यांच्या 'मर्ढेकरांची कविता' या- प्रथम १९५९ साली प्रकशित झालेल्या- पुस्तकात त्यांच्या तीन पुस्तकातील कविता एकत्र केल्या गेल्या आहेत (शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता) ..
त्यातल्या शिशिरागम या स्वतंत्र पुस्तकाचे प्रास्ताविक - 'उत्तरवारा म्हणाला-----'- लिहले होते - श्रीधर बाळकृष्ण रानडे यांनी ... (मला ते आवडते)...
ते माझ्याकडील 'मर्ढेकरांची कविता' च्या १९७७ मौज प्रकाशनाच्या आवृत्तीत परिशिष्टांत समाविष्ट केले आहे...
कोण हे रानडे? सोबतच्या रविकिरण मंडळ, १९२३ या फोटोत, त्यांचा आणि -ह्या फोटोनंतर २ वर्षांत वारलेल्या - त्यांच्या पत्नी यांचे फोटो पहा...मनोरमाबाई रानडे बीए होत्या... देशस्थ ब्राह्मण होत्या,,. रविकिरण मंडळातील त्या एकमेव स्त्री दिसत आहेत,,,१९२५ साली वारल्या,
त्यांचे कोकणस्थ मुलाशी (श्री बा रानडे) झालेले लग्न आणि माधव जूलियन यांचे कु गंगु गरुड (नंतरच्या सौ लीलाबाई पटवर्धन) या देशस्थ ब्राह्मण मुलीशी झालेले लग्न त्यावेळी वादाचे आणि चर्चेचे विषय होते... (त्या काळात अशी लग्न करून एक लुटुपुटुची क्रांती केल्याची भावना आणि समाधान तरुणाईला कदाचित मिळत असावी. कारण ह्या सगळ्या गोष्टीला पार्श्वभूमीआहे, २०व्या शतकाच्या पहिल्या भागाच्या भयानक, रक्तरंजित, उलथापालथीच्या भारताच्या आणि जगाच्या इतिहासाची.)
लीलाबाई पुस्तकात लिहतात मनोरमाबाई हुशार होत्या, माधव जूलियन त्यांच्याबद्दल बरेच कौतुकाने बोलत असत पण ते काय बोलत ह्या बद्दल एक अक्षर सुद्धा त्या लिहीत नाहीत , ना त्यांचे स्वतःचे मनोरमाबाई बद्दलचे मत त्या व्यक्त करतात.
गं. दे. खानोलकर यांच्या 'माधव ज्यूलियन', १९५१/१९६८ पुस्तकांत रानडे दांपत्याबद्दल पुष्कळ माहिती आहे. त्यातील एक लांबट उतारा इथे देतो. मनोरमाबाई वारल्यावर माधवराव लिहतात :
मनोरमाबाईंबद्दलची माहिती, त्यांचा फोटो आणि झालेला अकाली मृत्यू हे सगळे चटका लावून जाते.
डावीकडून दुसरे, जमिनीवर बसलेले, दिवाकर ... आज मार्च २०२१ मध्ये, दिवाकर काही प्रमाणात सोडले तर सगळे मंडळ (दोन चार कविता सोडल्यातर, अगदी brilliant माधव जूलियन सुद्धा) जवळ जवळ जनमानसातून अदृश्य झाले आहे ...आज त्यातील कोणाचीच पुस्तके बाजारात सहजपणे मिळत नाहीत....
श्रीमती पटवर्धन यांच्या पुस्तकात दिवाकरांचा क्वचितच उल्लेख आहे पण आज तोच 'किरण' थोडाफार लुकलुकतो आहे! (दिवाकर रविकिरण मंडळात पहिल्यांदा खूप active होते , नंतर ते त्यांच्या 'सोवळ्या' प्रकृतीमुळे दूर होत गेले.)
(हे चित्र साभार घेतले आहे, 'आमची अकरा वर्षे' ह्या लीलाबाई पटवर्धन यांच्या १९४५/१९९४ सालच्या पुस्तकातून... )